Maha Schemes : सरकारची योजना; २१ व्या वर्षी तुमची मुलगी होईल करोडपती !

Maha Schemes : सरकारची योजना; २१ व्या वर्षी तुमची मुलगी होईल करोडपती !

 

पालकांना मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या लग्नाची देखील काळजी असते. लग्न म्हटले की मोठा खर्च येतो. अशा गोष्टीचा विचार करून सरकारने एक योजना सुरू केली आहे.

sbi emergency%2Bloan

 

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते. त्यामुळेच त्यांचे शिक्षण उत्तम व्हावे आणि चांगल्या पद्धतीने त्याची वाढ व्हावी यासाठी सर्व जण प्रयत्न करत असतात. पालकांना मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या लग्नाची देखील काळजी असते. लग्न म्हटले की मोठा खर्च येतो. अशा गोष्टीचा विचार करून सरकारने एक योजना सुरू केली असून त्याचे नाव आहे सुकन्या समृद्धी योजना. या नुसार तुमची गुंतवणूक मुलीला २१व्या वर्षी करोडपती बनवू शकते.
 
सुकन्या समृद्धी योजना (sukanya) ही सरकारची स्मॉल डिपॉझिट स्कीम आहे. मुलींसाठी ही योजना सर्वात लोकप्रिय असून सरकारने ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अंतर्गत ही योजना सुरू केली होती.

या योजनेनुसार पालक आपल्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमा करू शकतात. मुलगी २१ वर्षाची होईपर्यंत परतावा म्हणून मोठी रक्कम मिळू शकते. सध्याच्या नियमानुसार जर मुलगी लहान असताना यात गुंतवणूक करण्यास सुरूवात केल्यास तर १५ वर्ष गुंतवणूक करता येते.