Maha Schemes : स्वामित्व योजना काय आहे | PM Swamitva Yojana

Maha Schemes : स्वामित्व योजना काय आहे | PM Swamitva Yojana

swamitva%2Byojana

 

PM Swamitva Yojana Benefits, Eligibility, Online Registration

प्रधानमंत्री नरेंद्र मांदी यांनी डिजीटल इंडीया चे स्वप्न पाहीले आहे त्यासाठी ते वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या योजनेचा ऑनलाईन शुभारंभ करत असतात. या योजने अंतर्गत पीएम मोदी यांनी एक नविन ई-ग्राम स्वराज पोर्टल सुरू केले असून यावर गाव समाजाविषयी असलेल्या अडचणी व तक्रारी ची माहिती राहील. पंचायती राज मंत्रालया ने ई ग्राम स्वराज पोर्टल ची सुरूवात केली आहे.

 

स्वामित्व योजना संपत्ति कार्ड

पंतप्राधन मोदी यांनी आज video conference द्वारे जमीन मालकांना या योजनेद्वारे संपत्ती कार्ड‍ वितरण करण्याविषयी घोषणा केली आहे. देशातील जवळपास एक लाख प्रॉपर्टी धारकांना मोबाईल फोनवर एसएमएस ज्या माध्यमातून लिंक पाठवण्यात येईल. लिंक वर क्लिक करून प्रापर्टी धारक आपले संपत्ती कार्ड डाउनलोड करून शकतील. या स्वामीत्व योजनेमूळे आता बँकेकडून जमीन मालकांना लोन मिळणार आहे. 11 ऑक्टोबर 2020 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी हरियाणा येथील 221, उत्तरप्रदेश येथील 346, महाराष्ट्र येथील 100, मध्य प्रदेश येथील 44, उत्तराखंड येथील 50 आणि कर्नाटक येथील दोन गावातील नागरीकांना आबादी जमीनीचा मालकी हक्काचे कागद वितरीत करण्यात येतील. स्वामित्व योजने अंतर्गत राजस्व विभागाद्वारे गावातील जमीनीचे रेकार्ड एकत्रीत करणे सुरू केले आहे. याबरोबरच वादाच्या जमिनीचा निपटारा करण्यासाठी राजस्व विभाग यांच्या द्वारे डिजीटल  अरेंजमेंट करण्यात येणार आहे.

 

PM Swamitva Yojana Property Card

प्रधानमंत्री स्वामित्व योजना प्रापर्टी कार्ड

आपणास माहिती आहेच की शासनाच्या मालकीच्या जमीनीचे गावामध्ये कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड उपलब्ध नाही. ही गोष्ट लक्षात घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजना सुरू केली आहे. मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ 11 आक्टोबर 2020 रोजी करण्यात आलेला असून यामध्ये 743 गावातील लोकांना ज्या जमीनीचे रेकॉर्ड उपलब्ध नाही अशांना त्यांच्या मालकी हक्क सोपविण्यात यईल. यामध्ये डिजिटल प्रापर्टी कार्ड चे सुध्दा वितरण केले जाणार आहे.

 

स्वामित्व योजना काय आहे?

पीएम मोदी द्वाररे सुरू करण्यात आलेली स्वामित्व योजनेच्या  (PM Swamitva Yojana)अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील समाजाचे काम ऑनलाइन केले जाणार आहे. स्वामीत्व योजनेमुळे जमीन हाडप करणारे भूमाफिया, फावणूक करणारे लोक यांची दुकानदारी पूर्णपणे बंद होईल अशी आशा आहे. ग्रामिण भागातील जनता ही आपल्या संपत्तीचे रेकॉर्ड आनलाईन पाहू शकेल. गावातील सर्व लोकांची संपत्ती चे रेकॉर्ड मॅपिंग करण्यात येणार‍ आहे. ज्याची जमीन आहे त्यांना ई-पोर्टल द्वारे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी घोषीत केले की येणाऱ्या वर्षी सामित्व योजना सन 2020 च्या आधारावर पंचायत राज दिवस साजरा करेल आणि यामध्ये पुरस्कार देण्याबाबत ही घोषणी केली आहे.

PM स्वामित्व योजनेची मुख्य वैशिष्टये –

 

योजना का नाम  – पीएम स्वामित्व योजना  (PM Swamitva Yojana)

विभाग          पंचायती राज मंत्रालय

घोषणा – पीएम मोदी द्वारा 24 अप्रैल 2020

आरंभ तिथि – 24 अप्रैल 2020

उद्देश्य –         लोन लेने में सुविधा

वेबसाइटhttps://egramswaraj.gov.in

प्रधानमंत्री स्वामित्व योजना उद्देश –

पंतप्रधान मोदी जी यांनी 24 एप्रिल 2020 रोजी पंचायत राज दिवशी शेतकऱ्यांना संबोधीत केले. प्रधानमंत्री स्वामित्व योजनेचा उद्देश खालील प्रमाणे आहे.

  1. ग्रामिण भागातील शेतकऱ्यांच्या जमीनीची ऑनलाईन देखरेख करणे.
  2. PM Swamitva Yojana अंतर्गत ड्रोन द्वारे जमीनीची मॅपिंग करणे.
  3. जमीनीच्या खऱ्या मालकांना जमीनीचा हक्क उपलब्ध करून देणे.
  4. जमीन प्रक्रिया मध्ये पारदर्शकता आणने.
  5. ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना घरांवर / शेतीवर लोन सहजरीत्या उपलब्ध होणे.
  6. PM Swamitva Yojana द्वारे शेतकत्यांना संपत्तीविषयक डिजीटल कार्ड वितरीत करणे.

स्वामित्व योजना प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन डाउनलोड कसे करावे?

 

प्रापर्टी धारकांना सरकार द्वारे वितरीत केले जाणारे संपत्ती कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील पायऱ्यांचा वापर करावा.

  • प्रापर्टी धारक शेतकऱ्यांच्या मोबाईल वर SMS पाठविला जाईल.
  • आलेला एसएमएस उघडावा.
  • एसएमएस मध्ये Property Card download करण्याबाबत ची लिंक मिळेल.
  • लिंक वर क्लिक करावे.
  • प्रापर्टी कार्ड डाउनलोड होईल.
  • त्यानंतर सर्व राज्यातील राज्य सरकार आपल्या राज्यातील प्रापर्टी धारकांना संपत्ती कार्ड वितरीत करतील

प्रधानमंत्री स्वामित्व योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया –

प्रधानमंत्री स्वामित्व 2020 चा अर्ज ऑनलाईन करण्यासाठी खालील स्टेप्स  फॉलो कराव्यात.

1. सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करून इच्छिणाऱ्यांनी पीएम स्वामित्व योजना च्या ऑफिशल वेबसाइट वर क्लिक करावे.

2. होम पेज उघडेल ज्यावर न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शन पहायला मिळेल.

3. न्यू रजिस्ट्रेशन  ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक फॉर्म उघडेल.

4. यामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून अचूक भरावी.

5. पूर्ण फॉर्म अचूक भरल्याची खात्री केल्यानंतर सबमीट बटनावर क्लिक करावे.

Read more