Sanjay Gandhi Niradhar Yojana | संजय गांधी निराधार योजना

Sanjay Gandhi Niradhar Yojana | संजय गांधी निराधार योजना

 

 संजय गांधी निराधार योजना

प्रस्‍तावना

महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक योजना चालविण्यात येत आहेत. त्यात संजय गांधी निराधार योजना आहे. ही योजना अत्यंत नावाजलेली असून या योजनेचा लाभ जवळपास वाडी वस्त्यांपर्यंत घेताना लाभार्थी पहायला मिळतात.

संजय गांधी निराधार योजना 2020 कोणासाठी –

राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती. अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 1000/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.

Read more