मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2021
शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देणे हे मुख्य उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून शासनातर्फे महावितरण द्वारे सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत सौर प्रकल्प उभारुन त्या भागातील कृषी वाहिन्यांना दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचे प्रयोजन केले आहे.
या योजनेद्वारे कृषी अतिभारीत उपकेंद्रांच्या 5 किमी च्या आत 2 ते 10 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करुन कृषी वाहिनी वर दिवसा वीज देणे योजिले आहे. महावितरण कंपनीने प्रस्तावित सौर प्रकल्पांच्या क्षमतेनुसार 33/11 के.व्ही. उपकेंद्रांची यादी उपल्ब्ध करुन दिली आहे. या योजनेला गतीमान करण्याकरिता व शेतक-यांकडे असलेल्या अतिरिक्त जमिनीचा उपयोग करुन त्यांना लाभ पोहचविण्याकरिता भाडेतत्वावर जमिन घेण्याचे योजिले आहे.
सदर जमीन शासकीय असल्यास शासन निर्णयानुसार नाममात्र रु.1/- च्या भाडेपट्टीवर 30 वर्षांसाठी घेण्यात येईल व खाजगी जमिनी रु.30,000/- प्रती एकर (प्रती वर्ष 3% वाढ) या दराने भाडे तत्वावर घेण्यात येतील.
official website – https://mahadiscom.in/solar-mskvy