अटल पेन्शन योजना (APY) – Atal Pension Yojana

अटल पेन्शन योजना (APY) – Atal Pension Yojana

 अटल पेन्शन योजना (APY) – Atal Pension Yojana अटल पेन्शन योजना 9 मे 2015 रोजी पंतप्रधानांनी सुरू केली. APY 18 ते 40 वयोगटातील सर्व बचत बँक/पोस्ट ऑफिस बचत बँक खातेधारकांसाठी खुले आहे आणि योगदान निवडलेल्या पेन्शनच्या रकमेवर अवलंबून असते. ग्राहकांना 60 वर्षांच्या वयात रु.1000/- किंवा रु.2000/- किंवा रु.3000/- किंवा रु.4000/- किंवा रु.5000/- ची हमी दिलेली … Read more

अटल बांबू समृद्धी योजना | Atal Bamboo Samrudhi Yojana

अटल बांबू समृद्धी योजना | Atal Bamboo Samrudhi Yojana

 

अटल बांबू समृद्धी योजना ( Atal Bamboo Samruddhi Scheme )

बांबू हे एक बहुपयोगी वनोपज असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यास “हिरवे सोने” (green gold) असे संबोधले जाते. मानवाच्या लाकूड विषयक गरजा पूर्ण करण्याकरिता सहज उपलब्ध होणारे व परवडणारे वनोपज असल्याने बांबूला ” गरीबांचे लाकूड ” (timber of poor)
असेही म्हटले जाते. बांबू ही जलद वाढणारी, सदाहरीत व दिर्घायु प्रजाती आहे. बांबू लागवडीमुळे शेतकऱयांना आर्थिक सुरक्षा (economic security) मिळण्याची क्षमता आहे.
mahayojana%2Bbamboo%2Bscheme

 

देशात बांबूची बाजारपेठ सुमारे रु.२६,००० कोटीची असून त्यामध्ये बांबू फर्निचर, बांबू पल्प, बांबू मॅट बोर्ड, कार्टेज इंडस्ट्रीज, प्लाय बोर्ड इत्यादी समाविष्ठ आहे. बांबूमध्ये जास्त गतीने कार्बन शोषण करुन ग्लोबल वार्मिंगलाही मात देण्याची अमर्यादित क्षमता आहे. या सर्व बाबींचा विचार करुन बांबूचा समुचित विकास करणे तसेच बांबूच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग गरीब जनतेच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता करणे व त्यायोगे संपूर्ण देशाचा विकास साधण्याकरिता केंद्र शासनाने राष्ट्रीय बांबू मिशन (National bamboo mission ) ची स्थापना केलेली आहे. बांबू लागवडीमुळे शोतक-यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होणार आहे. त्याकरीता शेतक-यांना उत्तम बांबू रोपांचा पुरवठा होणे आवश्‍यक आहे.

 

सद्यस्थितीत महाराष्ट्राबाहेरील राज्यांमधून बांबूची टिश्यू कल्चर रोपे उपलब्ध होतात. उत्तम गुणधर्म असलेल्या टिऱ्यू कल्चर बांबू रोपांची निर्मिती राज्यामध्येच करून ती शेतक-यांना होत जमिनीवर तसेच शेताच्या बांधावर लागवडीकरिता सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याच्या योजनेस दिनांक २७ जून
२०१९ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सदर मान्यतेच्या अनुषंगाने, शेतक-यांना सवलतीच्या दराने टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करण्यासाठी नवीन योजना सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Read more