महाराष्ट्राच्या मतदान टक्केवारीत वाढ

महाराष्ट्राच्या मतदान टक्केवारीत वाढ

  मुंबई, दि. २९ : केंद्रिय निवडणूक आयोगाने सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीसाठी सर्व राज्यांना मतदानाचे प्रमाण २०१९ च्या तुलनेत  अधिक प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच मतदानाची टक्केवारी कमी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले होते. महाराष्ट्रातील मतदान आकडेवारीत ही दोन्ही उद्दिष्ट साध्य झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य, यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली … Read more

मतदान केंद्रांवरील ‘पाळणाघरे’ सज्ज ठेवा

मतदान केंद्रांवरील ‘पाळणाघरे’ सज्ज ठेवा

छत्रपती संभाजीनगर, दि.४ (जिमाका):- मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मातांची बालके सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करावयाची आहे. ही जबाबदारी आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांनी संयुक्तपणे पार पाडावयाची असून ही पाळणाघरे मतदानाच्या आदल्यादिवशी म्हणजे दि.१२ रोजी सज्ज असायला हवी, यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  दिलीप स्वामी यांनी … Read more

मतदान : दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदान

मतदान : दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदान

मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : ➡️ बुलढाणा –  ५८.४५ टक्के ➡️ अकोला – ५८.०९ टक्के ➡️ अमरावती … Read more

उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ३६९ अर्ज वैध

उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ३६९ अर्ज वैध

मुंबई, दि. २६ : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले होते. आज या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण ३६९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत … Read more

मतदानाबाबत हाजुरी येथील दर्ग्यात जनजागृती

मतदानाबाबत हाजुरी येथील दर्ग्यात जनजागृती

ठाणे, दि. २६ (जिमाका) : हाजुरी येथील दर्गात मुस्लीम बांधवांच्या नमाज पठणानंतर स्वीप पथकाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. येत्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढावा व मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून दिनांक 20 मे रोजी सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. … Read more

मतदान टक्केवारी वाढण्यासाठी समन्वयाने काम करावे

मतदान टक्केवारी वाढण्यासाठी समन्वयाने काम करावे

रायगड, दि.२५ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे डॉ. कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी … Read more

मतदान जागृतीचा बॅटन घेऊन नवमतदार धावले!

मतदान जागृतीचा बॅटन घेऊन नवमतदार धावले!

नांदेड दि. २४ : आम्ही आपण मतदान करावे या प्रचारासाठी धावतोय. तुम्ही फक्त मतदान केंद्रापर्यंत चालत या, असे आवाहन जिल्ह्यातील तरुणांनी नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. पोलीस परेड ग्राउंडवर मतदान जागृतीचा बॅटन घेऊन नव मतदारांनी रिले स्पर्धेत भाग घेतला. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नांदेड जिल्हा स्वीप कक्षाने मतदान तरुण युवा मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व वाढावे, … Read more

मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचा चांगला उपयोग

मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचा चांगला उपयोग

रायगड(जिमाका),दि.13:- सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 मतदानाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. पथनाट्य, प्रभात फेरी आदी द्वारे नागरिकांमध्ये मतदानासाठी प्रेरित केले जात आहे, याचा जिल्ह्यातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी चांगला उपयोग होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले.  “वॉक फॉर वोट रॅली” चा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात  … Read more

मतदान केंद्रावर मतदान घेण्यासंबंधी दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे

मतदान केंद्रावर मतदान घेण्यासंबंधी दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार आणि सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर मतदारासंघातील क्षेत्रीय अधिकारी,मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांच्यासाठी मतदान घेण्याबाबतचे  प्रशिक्षण संपन्न.. सोलापूर, दि. २३ (जिमाका): जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील  निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्रावरती मतदान घेण्यासंबंधी दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन … Read more