Maha Schemes : कांदाचाळ अनुदान योजना | Kanda Chal Yojana

Maha Schemes : कांदाचाळ अनुदान योजना | Kanda Chal Yojana

 

kanda%2Bchal

कांदाचाळ अनुदान योजनेचा उद्देश –

महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये कांद्याचे पीक हे प्रमुख पिक म्हणून घेतले जाते. कांदा ही जास्त काळ टिकून रहावा. कांद्याला जास्त भाव मिळावा. कांद्याचे नुकसान कमी प्रमाणात व्हावे या साठी कांदाचाळ अनुदान योजना सुरू केलेली आहे.

कांदाचाळ अनुदान योजनेचे लाभार्थी –

1.वैयक्तीक शेतकरी
2.नोंदणीकृत कांदा उत्पादन करणाऱ्या सहकारी संस्था
3.उत्पन्न बाजार समित्या
4.सहकारी संस्था

कांदा चाळ उभारणीसाठी अर्थसहाय्य –

निर्धारीत कांदा चाळ बांधकाम खर्च 6000/- प्रति मे.टन असून अनुदान हे एकूण खर्चाच्या 25% म्हणजे 1500 रूपये देय राहील.

कांदा चाळ अनुदानासाठी अर्ज –

कांदाचाळीचे बांधकाम करण्यापुर्वी लाभार्थी शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील कांदाचाळीचा आराखडा व अर्ज संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावा. त्यानुसारच कांदाचाळीचे बांधकाम करणे बंधनकारक आहे. कांदाचाळीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यातील कांदाचाळी अनुदानाचा यांच्या प्रस्ताव संबंधीत बाजार समिती यांच्या कार्यालयात खालील बाबीसह सादर करावा. अचूक व परिपूर्ण प्रस्ताव योग्य ती शहानिशा करुन स्विकृत करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सचिव कृषि उत्पन्न बाजार समितीची राहील.

कांदा चाळीसाठी अर्ज केल्यानंतर सहाय्यक निबंधक स्तरावर केली जाणारी कार्यवाही – 

वैयक्तिक शेतकरी व सहकारी संस्था यांनी कांदा चाळीचे बांधकाम झाल्यानंतर योग्य कागदपत्रासह सहपत्रीत केलेले प्रस्ताव कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्या कार्यालयाकडे दाखल करावा. प्रस्तावांची छाननी केलेनंतर प्रत्यक्ष कांदाचाळीची पाहणी केल्यानंतर बाजार समिती मार्फत अर्ज स्विकृत करण्यात येईल. क्ष्यानंतर पणन मंडळाचा प्रतिनिधी, बाजार समितीचा प्रतिनिधी व सहाय्यक निबंधक यांचा प्रतिनिधी ही त्रिसदस्यीय समिती प्रत्यक्ष कांदाचाळीची पाहणी करतील. व शासन निर्णयात नमूद केलेनुसार मापदंड पूर्ण करणा-या कांदाचाळींना अनुदानाची शिफासर समिती करेल. लाभार्थींना अनुदानाबाबत खालीलप्रमाणे कार्यप्रणालीचा वापर करण्यात येईल.
1. ज्या कांदाचाळींचे बाँधकाम पूर्ण आहे आणि अनुदानाची शिफारस केलेले आहे अशा कांदाचाीची त्रिसदस्यीय समिती व शेतकरी यांचा फोटोग्राफ घेऊन तो प्रत्यक्ष तपासणी सूची सोबत जोडण्यात येईल. क्ष्यावर अशा फोटोवर समिती सदस्य स्वाक्षरी करेल. 
2. ज्या कांदाचाळ बांधकामामध्ये अपूर्णता आहे किंवा प्रस्तावामध्ये त्रुटी आहेत किंवा बांधकामामध्ये त्रुटी आहेत अशा चाळींबाबत त्रिसदस्यीय समिती लेखी स्वरुपात वैयक्तिक शेतकरी व बाजार समिती यांना लेखी त्रिसदस्यीय समितीच्या स्वाक्षरीसह कळवतील व असे प्रस्ताव त्रुटी पूर्ततेसाठी बाजार समितींना परत करतील त्रुटींचे प्रस्ताव पणन मंडळाकडे पाठविता येणार नाहीत.
3. कांदाचाळी यांचे बांधकाम नियमानुसार नाही किंवा खोटे प्रस्ताव दाखल केलेले आहेत असे प्रस्ताव समिती कायमस्वरुपी रद्द करतील.
4. बाजार समिती त्रिसदस्यीय समितीने शिफारस केलेले व कायमस्वरुपी रद्द केलेले प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीचा वापर करुन बाजार समितीस ही पणन मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे वर्ग करतील. 
5. विभागीय कार्यालयातून ऑन लाईन पध्दतीचा वापर करुन संपूर्ण नावाची छाननी करुन यापूर्वी अनुदान न दिल्याची खात्री पटल्यानंतर मुख्यालयास अनुदानासाठी त्रसदस्यीय समितीच्या तपासणू सूची व विभागीय उपसरव्यवस्थापक यांच्या शिफारशीसह मुख्यालायस अनुदानासाठी वर्ग करतील. 
6. मुख्यालयामार्फत प्राप्त त्रिसदस्यीय समितीचे अहवाल, विभागीय व्यवस्थापक यांचे अभिप्राय यांची छाननी करण्यात येईल. 
7. छाननी अंती पात्र लाभार्थींच्या नावे अनुदान मंजूरी आदेश मुख्यालयामार्फत काढण्यात येतील व वैयक्तिक लाभार्थीस धनादेशाद्वारे अनुदाने वितरण करण्यात येईल.

 

कांदा चाळ अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याची पध्दत –

(अ) वैयक्तिक शेतकऱ्यासाठी :

1. विहीत नमुन्यातील अर्ज. 
2. अर्जदाराच्या नावे स्वत:च्या मालकीची जमिन असावी. 5 ते 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळासाठी किमान एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे. तशी कांदा पिकाची नोंद असणारा 7/12 उताऱ्याची प्रत, 8-अ खाते उतारा अर्जासोबत जोडावा. 
3. वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहील, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत कर्ज मंजूरचे आदेशपत्र सहपत्रीत करणे आवश्यक आहे. 
4. कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाल्यास अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसूली लाभार्थीकडून करण्यात येईल. 
5. लाभार्थींनी कांदाचाळ बांधण्यापुर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात रु.20 च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करुन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा. 
6. अर्जासोबत खर्चाची मुळ बिले व गोषवारा जोडावा. 
7. कृषि विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला जोडावा. 
8. अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो जोडावा. 
9. सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येईल. 

 

(ब) सहकारी संस्थानी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल करण्याची पद्धत :

सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी कांदाचाळीचे काम चालू करणेपुर्वी कांदाचाळीबाबतचा प्रस्ताव पणन मंडळाचे मुख्य कार्यालये, पुणे येथे खालील बाबीच्या माहितीसह प्रस्ताव तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा. 
1. संस्थेने कांदा साठवणूक प्रकल्पाची उभारणी सुरु करणेपूर्वी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडे तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा.
2. संस्थेमार्फत किती मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी उभारणार याबाबत संस्थेच्या संचालक मंडळ सभेत पारीत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत अर्जासोबत जोडावी. 
3. प्रकल्पासाठी संस्थेच्या नावे जागा असलेबाबत पुरावा (गाव नमुना क्र.7, 7-अ/12) अथवा करीता कमी 30 वर्षे लीजवर घेतलेली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे. 
4. प्रस्तावीत जागेचा स्थळदर्शक नकशा. 
5. कांदा साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निधीचे नियोजन संस्था कशा रितीने उभारणी करणार याबाबत अर्जात स्पष्ट उल्लेख असावा. 

कांदा चाळ उभारताना घ्यावयाची काळजी –

सुधारीत पद्धतीनुसार कांदा चाळींमधील कांद्याला सर्व बाजूंनी हवा खेळती राहील या दृष्टीने आराखडा तयार केले आहेत. अनुदानास पात्र कांदा चाळींची उभारणी करताना खालील बाबींची दक्षता घेणे आवश्यक आहे. 
1 जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढा पाया खोदुन आराखडामध्ये दर्शविल्यानुसार सिमेंट काँक्रेटचे पिलर/कॉलम उभारणे आवश्यक आहे. 
2 कांदा सावणूकीची जागा जमिनीपासून दिड ते तीन फूट उंच असणे आवश्यक आहे. तथापी, ज्या भागात अती आर्द्रता असते अशा भागात खालील बाजूस हवा खेळती राहण्यासाठी मोकळी जागा सोडणे बंधंनकाराक असणार नाही. परंतु अतिउष्ण हवामानाच्या जिल्ह्यामध्ये खालील बाजूस मोकळी हवा खेळती राहील, यादृष्टीने कांदाचाळीची उभारणी करावी.
3 या पिलर/कॉलमवरती लोखंडी अँगल किंवा लाकडी खांबाद्वारे चाळीचा संपुर्ण सांगाडा तयार करावा. 
4 एक पाखी कांदा चाळीची उभारणी दक्षिण-उत्तर तर दुपाखी कांदाचाळी उभारणी पुर्व-पश्चिम करावी. कांदाचाळी साठी छपरासाठी सिमेंटचे पत्र अथवा मेंगलूर कवले यांचा वापर करावा. शक्यतो लोखंडी पत्र्याचा वापर टाळावा, वापर केल्यास त्याला आतील बाजूस पांढारा रंग द्यावा. बाजूच्या भिंती व तळ यासाठी बांबू अथवा तत्सम लाकडी पट्टा यांचा वापर करावा. तर पाया आर.सी.सी. खांब/स्तंभ उभारुन करावा. 
5. 25 मे.टन कांदाचाळी साठी लांबी 40 फुट (12 मी), प्रत्येक कप्प्याची दुपाखी चाळीसाठी रुंद 4 फुट (1.20 मी), बाजुची उंच 8 फुट (2.4 मी) मधली उंच 11.1 फुट (3.35 मी), दोन ओळीतील मोकळ्या जागेची रुंद 5 फुट (1.50 मी), कांदाचाळीची एकुण रुंद 4 अ 5 अ 4 उ 13 फुट (3.9 मी) अशा रितीने कांदा चाळीचे बांधकाम करताना आकारमान घ्यावीत. चाळीची आतील कप्प्याची रुंदी ही 4 फुट (1.20 मी) पेक्षा जास्त नसावी. 50 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी लांबीचे प्रमाण दुप्पट करावे व रुंदी/उंचीचे प्रमाण हे 25 मे.टन क्षमतेप्रमाणे कायम राहील. 
6 कांद्याची साठवणूक फक्त 5 फुटांपर्यंत करावी. 
7 चाळाच्या छतास पुरेसा ढाळ द्यावा. कांदा चाळीच्या छतासाठी वापरण्यात आलेले पत्रे बांधकामापेक्षा 1 मीटर लांब असावेत व छताचा कोन 22 अंश अंकाचा असावा.
8 कांदाचाळीचे छत हे उन्हाळ्यामध्ये उष्णता प्रतिबंधक वस्तुंनी अच्छादीत करावे.
 

कांदा चाळी उभारताना खालील गोष्टी टाळाव्यात –

1 कांदा चाळीसाठी पानथळ/खोलगट ठिकाणीची कच्चे रस्ते असणारी जमीन टाळावी. 
2 हवा नैसर्गिक रित्या खेळती राहण्यास असलेले अडथळे टाळावे अथवा कमी करावे, 
3 कांदा चाळीचे लगत कोणतेही उंच बांधकाम असू नये. 
4 निवाऱ्याच्या बाजूच्या भिंतीची फ्लॅट फॉर्मची खालील झडप बंद असावी, जेथे वादळ आणि वादळी वारे अपेक्षीत आहे, अशा ठिकाणी हवेची/वाऱ्याची बाजू उघडी असेल तर निवाऱ्याची बाजू बंद असु नये. 
5 वादळ आणि जोरदार पावसामध्ये वाऱ्याची बाजू बंद करण्याची व्यवस्था असावी. आवश्यकता असेल तेव्हा उघडता यावी. 
6 कांदाचाळींमध्ये वरच्या बाजूस उष्णता प्रतिबंधक छताचे साहित्याचा वापर करावा. छतासाठी लोखंडी पन्हाळी पत्र्यासारख्या साहित्याचा वापर टाळावा. 

कांदा चाळीसाठी ऑनलाईन अर्ज  https://hortnet.gov.in/Login-mah.aspx

Read more