आदिवासी कुटुंबाच्या परसबागेसाठी चाळीस लाख रुपयांच्या निधीस मान्यता

आदिवासी कुटुंबाच्या परसबागेसाठी चाळीस लाख रुपयांच्या निधीस मान्यता

मुंबई दि. २६ : राज्यातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन २०२४-२५ मध्ये राबविण्यासाठी 40 लाख रुपये एवढ्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील ठाणे, पालघर ,पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर ,अमरावती व गोंदिया या १४ जिल्ह्यातील … Read more

समाजातील शेवटच्या घटकाला मूलभूत अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची

समाजातील शेवटच्या घटकाला मूलभूत अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची

ठाणे, दि. १८ (जिमाका): भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला कलम 21 नुसार जगण्याच्या अधिकाराची हमी दिली आहे. कायद्यानुसार हा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही. या अधिकाराद्वारे प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणूनच समाजातील शेवटच्या व्यक्तीला त्याचा मूलभूत अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. यासाठीच सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवून कर्तव्यपूर्ती … Read more

आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षणाचा प्रस्ताव तयार करावा – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षणाचा प्रस्ताव तयार करावा – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षणाचा प्रस्ताव तयार करावा – मंत्री डॉ. विजयकुमार गावित मुंबई, ‍‍दि. 31 : आदिवासी भागातील शेतकरी, युवक आणि महिलांना रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ तयार करण्याचे निर्देश आदिवासी … Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आदिवासी जनजातींना मिळाला विकासाचा मार्ग

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आदिवासी जनजातींना मिळाला विकासाचा मार्ग

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आदिवासी जनजातींना मिळाला विकासाचा मार्ग नांदेड (जिमाका) दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनाही विकासाची संधी भेटली पाहिजे. त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण होतील अशा योजना साकारून त्यांना नवे मार्ग मिळावेत यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी ठेवली. त्यांनी आदिवासी क्षेत्राच्या विकासाचा एक … Read more

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पेसा’ कायदा महत्त्वाचा-केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पेसा’ कायदा महत्त्वाचा-केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पेसा’ कायदा महत्त्वाचा-केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज पुणे दि.११: आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पेसा’ कायदा अतिशय महत्त्वाचा असून आगामी काळात या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी केले . यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे केंद्रीय पंचायती राज मंत्रालयातर्फे पंचायत (अनुसूचित क्षेत्र विस्तार … Read more

आदिवासी बांधवांना लागणारी विविध ओळखपत्रे आणि दाखल्यांचा खर्च शासन करणार

आदिवासी बांधवांना लागणारी विविध ओळखपत्रे आणि दाखल्यांचा खर्च शासन करणार

आदिवासी बांधवांना लागणारी विविध ओळखपत्रे आणि दाखल्यांचा खर्च शासन करणार नंदुरबार : दिनांक १० सप्टेंबर २०२३ (जिमाका वृत्त ) आदिवासी बांधवांसाठी शासनाने विविध कल्याणकारी योजनांची आखणी केली आहे, या योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध प्रकारचे दाखले, ओळखपत्रे त्यांच्याकडे असणे अनिवार्य असते. केवळ ती नसल्यामुळे अनेक आदिवासी बांधव त्यांच्या हक्काच्या योजना व त्यांच्या लाभापासून वंचित राहत असल्यामुळे … Read more

लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावलेल्या आदिवासी बांधवाना खावटी योजनेतून मदत

लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावलेल्या आदिवासी बांधवाना खावटी योजनेतून मदत

आदिवासी विकास मंत्री ॲङ के.सी. पाडवी यांनी साधला आजी-माजी लोकप्रतिनिधींसोबत संवाद…   मुंबई, दि,. १० : लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावल्यामुळे अनेक आदिवासी कुटुंबांसमोर आर्थिक संकट आले आहे. अशावेळी त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागमार्फत खावटी अनुदानाच्या स्वरुपात मदत देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲङ के. सी. पाडवी यांनी आज विविध जिल्ह्यातील आदिवासी जमातीतील लोकप्रतिनिधींसोबत बोलताना दिली. तसेच विविध राज्यात व जिल्ह्यात अडकलेल्या आदिवासी बांधवाना सुखरूप त्यांच्या मूळ गावी मोफत परत आणण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी आज राज्याच्या विविध जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच समाजातील मान्यवरांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सुरुवातीस गोंदिया जिल्ह्यातील माजी आमदार दिवंगत श्री.रामरतन राऊत यांना तसेच औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पडलेल्या मध्य प्रदेशातील आदिवासी मजुरांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी श्री.पाडवी यांनी, कोरोना विषाणूच्या  संसर्गाच्या अनुषंगाने  करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे आदिवासी मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या समोर अनेक आर्थिक समस्या उभ्या राहिल्या आहेत. या समस्यांचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकप्रतिनिधींना दिली. स्थलांतरित मजुरांना, विद्यार्थ्यांना ,नोकर वर्गांना त्यांच्या मूळ गावी मोफत  पोहोचवण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहितीही त्यांनी दिली. सध्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली असून याबाबत रोजगार हमी योजनेच्या विभागाला आवश्यक ते निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी भागातील प्रत्येक जिल्ह्यातून उद्भवलेल्या प्रश्नांची माहिती अॅड.पाडवी यांनी लोकप्रतिनिधींकडून जाणून घेतली. आदिवासी भागांमध्ये रेशन कार्ड नसलेल्या अनेक आदिवासी कुटुंबांना रेशन मिळत नसल्यामुळे यांच्यासमोर उद्भवलेल्या समस्याच्या अनुषंगाने त्यांना तात्काळ ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड देणे, त्याद्वारे अन्नधान्य वाटप करणे यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा करत असल्याचेही मंत्री महोदयांनी सांगितले. आदिवासीच्या जीवनाशी संबंधित योजना राबविणार आदिवासी विकास विभागासमोर आदिवासी जगवण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा असून यासाठी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या निधीचा वापर करून त्याचे पुनर्नियोजन करून या पुढील काळात फक्त आदिवासींच्या जीवनाशी संबंधित हिताच्या योजना राबविण्यात येतील. यासाठी केंद्रीय निधीच्या सध्या चालू असलेल्या व अद्याप सुरू न झालेल्या सर्व योजनांचा फेरआढावा घेण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांना वीस दिवसांपूर्वीच देण्यात आले असल्याचे व आदिवासी लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे मंत्री  के. सी. पाडवी यांनी सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींना सांगितले. आदिवासी विभागाच्या कामावर मान्यवरांनी व्यक्त केले समाधान  मागील दीड महिन्यात आदिवासी विकास विभागाने तातडीने पावले उचलून आदिवासी नागरिकांना न्याय देण्याची चांगली भूमिका निभावली असल्याचे व याबाबतसमाधान असल्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे व प्राध्यापक वसंत पुरके यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी केल्या सूचना अमरावतीच्या मेळघाट परिसरातील आदिवासी बांधवांना रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्याची तसेच मेळघाट भागामध्ये आदिवासी विकास महामंडळाचे गहू, चना ,मका खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी माजी आमदार केवलराम काळे यांनी केली. तर गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यामध्ये तेंदुपत्ता संकलन केलेल्या गावांमध्ये कंत्राटदारांना येण्यास सध्या लोकांनी मज्जाव केला आहे, याबाबतीत सोशल डिस्टन्सींग तत्त्वाचे पालन करून योग्य ती खबरदारी घेऊन त्या लोकांना गावात येऊन आदिवासींच्या जीवनातील आर्थिक चक्र पूर्ववत सुरू करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याची मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केली. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्राध्यापक वसंत पुरके, धर्मराव बाबा आत्राम यांनी मार्गदर्शन केले. तसेच खासदार राजेंद्र गावित व आमदार सुनील भुसारा यांनी पालघरमध्ये कातकरी लोकांना मदत तात्काळ दिली गेली पाहिजे याबाबतची मागणी केली. शहरातील व आदिवासी क्षेत्र व्यतिरिक्त इतर क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी लोकांनाही खावटी योजनेचा लाभ देण्याची मागणी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांनी केली. तसेच आगामी काळात पाऊस पडल्यानंतर शेतीचे कामे करण्यासाठी पैसे नसल्याने आदिवासी शेतकऱ्यांना बी- बियाणे खताच्या स्वरुपात मदत कशी देता येईल याबाबतही कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली. वरकरणी आदिवासी हिताच्या दिसत असलेल्या परंतु आदिवासींच्या जीवनातील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक न करणारे योजनांचा फेरआढावा घेऊन त्या तातडीने बंद करण्यात याव्यात व त्या निधीचा वापर  आदिवासींच्या जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी करावा. तसेच डीबीटी पद्धतीने विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्तीची पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणेच आश्रम शाळेमध्ये वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा व सेंट्रल किचन यंत्रणा बंद करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केली.