पीकविमा योजना

  योजनेचे नाव :-  पीकविमा योजना स्रोत  :-   आपले सरकार योजनेचे महत्वाचे उद्देश :- १. पाऊस,तापमान,सापेक्षआर्द्रता व वेगाचेवारे या हवामान धोक्यापासुन निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकांना विमासंरक्षण आणिआर्थिक सहाय्य देणे. २. फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठिण परिस्थित शेतकांचेआर्थिक स्थैर्य आबाधीत राखणे.   योजनेची थोडक्यात माहिती :- १. हवामान धोकालागू झाल्याची नोंद संबधित महसूलमंडाळातील स्वयंचलित हवामानकेंद्रामध्ये झाल्यावरच विमानुकसान भरपाई … Read more

रेशन किती मिळते ? पहा -Ration card Status

रेशन किती मिळते ? पहा -Ration card Status

   नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला तुमचे रेशन किती मिळते? हे माहित नसेल तर आम्ही या लेख मध्ये mahaepos.gov.in/src या महाराष्ट्र च्या वेबसाईट वर आपण रेशन कार्ड तुम्हाला मिळतेय त्याचा तपशील पाहू शकता ते कसे? तर यासाठी हे योग्य स्थान आहे पुढील माहिती संपूर्ण पहा. Check Ration card Status Maharashtra?                Watch video … Read more

शिवभोजन योजना – Shiv Bhojan Thali Yojana

शिवभोजन योजना – Shiv Bhojan Thali Yojana

शिवभोजन योजना Shiv Bhojan Thali Yojana: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या ‘शिवभोजन’ योजनेची सुरुवात २६ जानेवारीपासून होणार आहे. जाणून घ्या या योजनेबाबत सविस्तर माहिती.           थोडं पण कामाचं २६ जानेवारीपासून राज्यात शिवभोजन योजना होणार सुरू स्वस्त दरात पोषक आणि ताजे भोजन मिळणार पहिल्या टप्प्यात ५० ठिकाणी शिवभोजन केंद्रांचा    … Read more

“माझी कन्या भाग्यश्री” योजना | Majhi Kanya Bhagyashree Yojana

“माझी कन्या भाग्यश्री” योजना | Majhi  Kanya Bhagyashree Yojana

“माझी कन्या भाग्यश्री” योजना        Majhi Bhagyashree Kanya Yojana in Marathi 1 ऑगस्ट 2017 पासून महिला आणि बाल विकास, महाराष्ट्र शासनातर्फे सर्वप्रथम ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ मुलींना मिळणार आहे. तुम्ही जर महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्ही माझी भाग्यश्री कन्या योजनेचाही लाभ घेऊ शकता. या योजने अंतर्गत, शासन … Read more

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)       सारांश पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंबथेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन. या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून … Read more

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA)

प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA)

    प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA) विभाग –  कौशल्य विकास व उद्योजकता विभाग   योजनेचा उद्देश –  राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांना त्यांच्या रुचीच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग,सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. लाभाचा तपशील खालील नमूद विविध क्षेत्रातील कौशल्ये विकासित करण्याकरीता … Read more

लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावलेल्या आदिवासी बांधवाना खावटी योजनेतून मदत

लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावलेल्या आदिवासी बांधवाना खावटी योजनेतून मदत

आदिवासी विकास मंत्री ॲङ के.सी. पाडवी यांनी साधला आजी-माजी लोकप्रतिनिधींसोबत संवाद…   मुंबई, दि,. १० : लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावल्यामुळे अनेक आदिवासी कुटुंबांसमोर आर्थिक संकट आले आहे. अशावेळी त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागमार्फत खावटी अनुदानाच्या स्वरुपात मदत देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲङ के. सी. पाडवी यांनी आज विविध जिल्ह्यातील आदिवासी जमातीतील लोकप्रतिनिधींसोबत बोलताना दिली. तसेच विविध राज्यात व जिल्ह्यात अडकलेल्या आदिवासी बांधवाना सुखरूप त्यांच्या मूळ गावी मोफत परत आणण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी आज राज्याच्या विविध जिल्ह्यातील आदिवासी जमातीच्या आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच समाजातील मान्यवरांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. सुरुवातीस गोंदिया जिल्ह्यातील माजी आमदार दिवंगत श्री.रामरतन राऊत यांना तसेच औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पडलेल्या मध्य प्रदेशातील आदिवासी मजुरांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी श्री.पाडवी यांनी, कोरोना विषाणूच्या  संसर्गाच्या अनुषंगाने  करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे आदिवासी मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या समोर अनेक आर्थिक समस्या उभ्या राहिल्या आहेत. या समस्यांचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकप्रतिनिधींना दिली. स्थलांतरित मजुरांना, विद्यार्थ्यांना ,नोकर वर्गांना त्यांच्या मूळ गावी मोफत  पोहोचवण्यासाठी आदिवासी विकास विभागाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहितीही त्यांनी दिली. सध्या रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली असून याबाबत रोजगार हमी योजनेच्या विभागाला आवश्यक ते निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. आदिवासी भागातील प्रत्येक जिल्ह्यातून उद्भवलेल्या प्रश्नांची माहिती अॅड.पाडवी यांनी लोकप्रतिनिधींकडून जाणून घेतली. आदिवासी भागांमध्ये रेशन कार्ड नसलेल्या अनेक आदिवासी कुटुंबांना रेशन मिळत नसल्यामुळे यांच्यासमोर उद्भवलेल्या समस्याच्या अनुषंगाने त्यांना तात्काळ ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड देणे, त्याद्वारे अन्नधान्य वाटप करणे यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे पाठपुरावा करत असल्याचेही मंत्री महोदयांनी सांगितले. आदिवासीच्या जीवनाशी संबंधित योजना राबविणार आदिवासी विकास विभागासमोर आदिवासी जगवण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा असून यासाठी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या निधीचा वापर करून त्याचे पुनर्नियोजन करून या पुढील काळात फक्त आदिवासींच्या जीवनाशी संबंधित हिताच्या योजना राबविण्यात येतील. यासाठी केंद्रीय निधीच्या सध्या चालू असलेल्या व अद्याप सुरू न झालेल्या सर्व योजनांचा फेरआढावा घेण्याचे निर्देश आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिवांना वीस दिवसांपूर्वीच देण्यात आले असल्याचे व आदिवासी लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे मंत्री  के. सी. पाडवी यांनी सर्व उपस्थित लोकप्रतिनिधींना सांगितले. आदिवासी विभागाच्या कामावर मान्यवरांनी व्यक्त केले समाधान  मागील दीड महिन्यात आदिवासी विकास विभागाने तातडीने पावले उचलून आदिवासी नागरिकांना न्याय देण्याची चांगली भूमिका निभावली असल्याचे व याबाबतसमाधान असल्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे व प्राध्यापक वसंत पुरके यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी केल्या सूचना अमरावतीच्या मेळघाट परिसरातील आदिवासी बांधवांना रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्याची तसेच मेळघाट भागामध्ये आदिवासी विकास महामंडळाचे गहू, चना ,मका खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी माजी आमदार केवलराम काळे यांनी केली. तर गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यामध्ये तेंदुपत्ता संकलन केलेल्या गावांमध्ये कंत्राटदारांना येण्यास सध्या लोकांनी मज्जाव केला आहे, याबाबतीत सोशल डिस्टन्सींग तत्त्वाचे पालन करून योग्य ती खबरदारी घेऊन त्या लोकांना गावात येऊन आदिवासींच्या जीवनातील आर्थिक चक्र पूर्ववत सुरू करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याची मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केली. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्राध्यापक वसंत पुरके, धर्मराव बाबा आत्राम यांनी मार्गदर्शन केले. तसेच खासदार राजेंद्र गावित व आमदार सुनील भुसारा यांनी पालघरमध्ये कातकरी लोकांना मदत तात्काळ दिली गेली पाहिजे याबाबतची मागणी केली. शहरातील व आदिवासी क्षेत्र व्यतिरिक्त इतर क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी लोकांनाही खावटी योजनेचा लाभ देण्याची मागणी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांनी केली. तसेच आगामी काळात पाऊस पडल्यानंतर शेतीचे कामे करण्यासाठी पैसे नसल्याने आदिवासी शेतकऱ्यांना बी- बियाणे खताच्या स्वरुपात मदत कशी देता येईल याबाबतही कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी केली. वरकरणी आदिवासी हिताच्या दिसत असलेल्या परंतु आदिवासींच्या जीवनातील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक न करणारे योजनांचा फेरआढावा घेऊन त्या तातडीने बंद करण्यात याव्यात व त्या निधीचा वापर  आदिवासींच्या जीवनातील प्रश्न सोडवण्यासाठी करावा. तसेच डीबीटी पद्धतीने विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्तीची पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणेच आश्रम शाळेमध्ये वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा व सेंट्रल किचन यंत्रणा बंद करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी केली.

लॉकडाऊनमध्ये 45 मिनिटांत मिळवा 5 लाखांचं कर्ज, 6 महिने EMI नाही! ‘या’ बॅंकेनं सुरू केली सेवा

लॉकडाऊनमध्ये 45 मिनिटांत मिळवा 5 लाखांचं कर्ज, 6 महिने EMI नाही! ‘या’ बॅंकेनं सुरू केली सेवा

सध्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत केवळ 45 मिनिटांमध्ये 5 लाखांचे कर्ज देण्याची सेवा SBI बॅंकेनं सुरू केली आहे.                                      नवी दिल्ली, 04 मे : कोरोना विषाणूमुळे देशभरात 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यामुळं अनावश्यक … Read more

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिला जन-धन खात्यांमध्ये जमा झालेल्या रकमेची माहिती

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिला जन-धन खात्यांमध्ये जमा झालेल्या रकमेची माहिती

देशामध्ये असलेल्या लॉकडाऊन मुळे अनेक उद्योग बंद आहेत. त्यामुळे देशातील गरीब जनतेचे व शेतकर्‍यांचे हाल होऊ नयेत म्हणून केंद्र सरकार व प्रत्येक राज्य सरकार पावले उचलत आहेत. पीएम किसान योजना, उज्वला योजना, महिला जन धन खाते व इतर अनेक लाभार्थीना मदत देण्याचे काम चालू आहे. केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर ह्यांनी दिलेल्या महितीनुसार प्रधानमंत्री … Read more

Maha Schemes | महात्मा फुले जन आरोग्य योजनेत राज्यातील १०० टक्के लोकसंख्येचा समावेश

Maha Schemes | महात्मा फुले जन आरोग्य योजनेत राज्यातील १०० टक्के लोकसंख्येचा समावेश

महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जनतेला आरोग्यदायी भेट! कोरोना रुग्णांकडून अवाजवी दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप मुंबई, दि. १: महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला. राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस  विमा संरक्षण देणारे … Read more