लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात पशुपालकांच्या खात्यांवर २५.३१ कोटी रुपये जमा – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात पशुपालकांच्या खात्यांवर २५.३१ कोटी रुपये जमा – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

मुंबई, दि. २६ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले,अशा पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २५.३१ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. श्री. सिंह म्हणाले, राज्यामध्ये दि. 26.11.2022 अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3775 संसर्गकेंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 309064 बाधित … Read more

पीक विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

  मुंबई, दि. 15 – प्रधानमंत्री पीक विमा योजनेत विमा हप्ता भरलेल्या आणि नैसर्गिक आपत्ती तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे विमा भरपाई रक्कम मिळण्यासाठी नोंदणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांची आहे. या भरपाईपोटीची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर येत्या आठ-दहा दिवसात वर्ग करावी, असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विमा … Read more

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन-swadhar yojana

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन-swadhar yojana

मुंबई, दि. 15 : मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यात येणार असून ज्यांना वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या/शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या … Read more

mukhyamantri kisan yojana maharashtra

mukhyamantri kisan yojana maharashtra

                  Mukhyamantri kisan yojana Maharashtra     मुंबई – राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकराच्या  PM Kisan योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी  मुख्यमंत्री किसान योजना सुरू कऱण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहे. या योजनेतून … Read more

PMEGP details in marathi

PMEGP details in marathi

 

AVvXsEhsCkSeWoTtkULHqIodvkwB dhWntZxzi qMRi0EYx898B0iQSlp8fEXsfc0EBCoQmg R2h 56VPZ8Z4XPBS8R3fZX3TDZ2pw76fzehQpJhnURxDpHqqZH3sTtdqxah9fAnFMBLOia b2QEnrkACNqcb8Hkc4r 4U4zzW k0vwQ1TYTm2Pn8WF19A70A

 

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP)

परिचय

केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम येाजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना या दोन योजना एकत्रित करुन पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) १५ ऑगस्ट २००८ पासून जाहीर केली आहे. सदर योजनेचा मुख्य उद्देश हा स्वयंरोजगार उभारणीस प्रोत्साहन देण्यासाठी सुलभ तत्वावर भांडवल उभारणी करुन देणे हा आहे. राज्यात राष्ट्रीयकृत बँकां मार्फत सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग, खादी ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्र या तीन यंत्रणेमार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. राज्य खादी ग्रामोद्योग आयोग, मुंबई सदर योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते.

योजनेअंतर्गत सुविधा

उत्पादित उद्योग घटकांना कमाल ₹ २५ लाखापर्यंत तसेच व्यवसाय-सेवा उद्योग घटकांना कमाल ₹ १० लाखापर्यंतचे अर्थसहाय्य बँकामार्फत केले जाते. उद्योग घटकास ५ ते १० टक्के रक्कम स्वगुंतवणूक करावी लागते. बँकेचा कर्ज समभाग ९० ते ९५ पर्यंत असतो. संक्षिप्त विवरण खालीलप्रमाणे आहे.

 

प्रवर्ग लाभार्थ्याचे भांडवल मार्जीन मनी (अनुदान)
शहरी भागासाठी ग्रामीण भागासाठी
सर्वसाधारणगट १०% १५% २५%
अनु.जाती / जमाती / इतर मागासवर्गीय जाती / अल्पसंख्याक / माजीसैनिक / महिला/ अपंग ५% २५% ३५%

 

पात्रता अटी

योजनेअंतर्गत पात्रता अटी:

  • अर्जदाराचे वय कमीत कमी १८ पूर्ण असावे.
  • उत्पन्नाची अट नाही.
  • योजनअंतर्गत रक्कम ₹ ५ ते २५ लाखापर्यंतचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे शिक्षण किमान ८ वी पास असणे अनिर्वाय आहे.
  • वैयक्तिक लाभार्थी, स्वंयसहायता बचत गट, सहकारी सोसायटया, उत्पादीत सह सोसायटी, चॅरीटेबल ट्रस्ट इ. सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • सदर योजनेअंतर्गत फक्त नवीन प्रकल्पाकरिताच अर्थसहाय्य केले जाते. यापूर्वी स्थापित घटकांना लाभ घेता येत, नाही.
  • योजनेचा लाभ मिळण्यास पात्र होण्यासाठी लाभार्थीने किंवा त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. त्याचप्रमाणे ते कोणत्याही बँकेचे थकबाकीदार नसावे.

अंमलबजावणी

सदर योजनेसाठीचा यंत्रणेनिहाय लक्षांक व मार्जिन मनी निधी केंद्र शासनाकडून खादी ग्रामोद्योग आयोग या नोडल एजन्सीकडे प्राप्त होतो. नोडल एजन्सीमार्फत सदर प्रकल्प लक्षांक व मार्जिन मनी निधी प्रत्येक यंत्रणेला वाटप केला जातो. यंत्रणेमार्फत त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व जिल्हा कार्यालयास लक्षांक वाटप करण्यात येतो.

संबधित जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यास दिलेल्या लक्षांकाच्या दीड ते दोन पट अर्ज स्विकारण्यात येतात. प्राप्त अर्जांची छाननी योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार केली जाते. सर्व प्रस्तावास e-tracking ID क्रमांक दिला जातो. पात्र ठरलेले अर्ज जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या जिल्हा कार्यबल समितीच्या शिफारशीने संबंधित जिल्हा स्तरीय बँकेकडे पाठविले जातात. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर व लाभार्थीने आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बँक लाभार्थ्यास कर्जवितरण करते. बँक कर्ज परतफेडीचा कालावधी ३-७ वर्षापर्यंतचा असतो. बँक कर्जाचा व्याजदर प्रचलित दराप्रमाणे (Normal interest) असतो. कर्ज मंजूरीनंतर व वाटपापूर्वी लाभार्थ्यास संबंधित व्यवसायाचे उद्योजकीय प्रशिक्षण (EDP Training) घेणे अनिर्वाय आहे. लाभार्थ्यास कर्जाचा पहिला हप्ता वाटप केल्यानंतर नोडल बँकेत मार्जिन मनी अनुदानासाठी प्रकरण पाठविले जाते. तदनंतर मार्जिन मनी (अनुदान) नोडल बँकेकडून कर्ज देणा-या बँकेस वितरीत करण्यात येते.

वितरीत करण्यात आलेले मार्जिन मनी (अनुदान) लाभार्थीचे नांवे ३ वर्षाकरिता टिडीआर (टर्म डिपॉझिट रिसीट) मध्ये डिपॉझिट करण्यात येते. तीन वर्षानंतर आवश्यक ती खात्री केल्यानंतर मार्जिन मनी रक्कम कर्ज खात्यात वळती केली जाते. याप्रकारे लाभार्थीस त्याच्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज सुविधा तसेच अनुदान सुविधा उपलब्ध करण्यात येते.

Read more

लय भारी… 299 रुपयांमध्ये 10 लाखांचा विमा, …आणि बरेच फायदे -Postal Department Insurance

लय भारी… 299 रुपयांमध्ये 10 लाखांचा विमा, …आणि बरेच फायदे -Postal Department Insurance

 

Post office insurance scheme

Postal Department Insurance:विमा योजनेत, लाभार्थीचा 10 लाख रुपयांचा विमा एका वर्षात केवळ 299 आणि 399 रुपयांच्या प्रीमियमसह काढला जाईल. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी या विम्याचे नूतनीकरण करावे लागेल. यासाठी पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत लाभार्थीचे खाते असणे बंधनकारक आहे.

Post Office : महागड्या प्रीमियममध्ये विमा काढू न शकणार्‍या गरीब लोकांसाठी पोस्ट विभागाने सुरक्षा का पहला कदम नावाची विमा योजना आणली आहे. या विमा योजनेत, लाभार्थीचा वर्षभरात फक्त 299 आणि 399 रुपयांच्या प्रीमियमसह 10 लाख रुपयांचा विमा उतरवला जाईल. (10 lakh insurance for Rs 299, you can take advantage of posta scheme)

1 वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी या विम्याचे नूतनीकरण करावे लागेल. यासाठी पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत लाभार्थीचे खाते असणे बंधनकारक आहे. 299 रुपयांचा विमा अपघाती मृत्यू, कायमचे पूर्ण अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व यावर 10 लाख रुपयांचे संरक्षण प्रदान करेल. यासोबतच 299 रुपयांच्या या विम्यामध्ये अपघात उपचारासाठी 60,000 रुपयांपर्यंतचा IPD खर्च आणि OPD क्लेममध्ये 30,000 रुपयांपर्यंतचा खर्च उपलब्ध होणार आहे.

399 रुपयांच्या प्रीमियममध्ये अपघाती मृत्यू, कायमचे पूर्ण अपंगत्व किंवा 10 लाख रुपयांचे कायमचे आंशिक अपंगत्व, आयपीडी वैद्यकीय दाव्यासाठी 60,000 रुपयांपर्यंत अपघाती इजा, 30,000 ओपीडी दावा, दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा समावेश आहे.

दहा दिवस रूग्णालयात दररोज हजार, कुटुंबाचा वाहतूक खर्च रु. 25,000 पर्यंत, अंत्यविधीचा खर्च रु. 5,000 पर्यंत. वरिष्ठ डाक विभाग हमीरपूर नरेंद्र कुमार यांनी सांगितले की, 30 जूनपासून ही विमा योजना विभागाने सुरू केली आहे. 

 

Read more

जमीन N.A. करण्याच्या प्रक्रियेतले काय आहेत 3 मोठे बदल ? जाणून घ्या…

जमीन N.A. करण्याच्या प्रक्रियेतले काय आहेत 3 मोठे बदल ? जाणून घ्या…

        how to get na order copy online शेतकरी असाल तर तुम्ही N.A. शब्द ऐकला नसेल असं अजिबात होणार नाही. पण, एनएची प्रक्रिया ही किचकट आणि वेळखाऊ असल्याची तक्रार वारंवार सामान्य नागरिकांकडून केली जात होती. एखादी जमीन एनए करायची म्हटल्यावर त्यासाठी वेगवेगळ्या विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रं घ्यावी लागायची आणि यासाठी बराच वेळ लागायचा. … Read more

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे मंत्री सुनील केदार यांचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे मंत्री सुनील केदार यांचे आवाहन

  मुंबई –  दि. 3 :राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असून पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय … Read more