मनोज सौनिक यांनी स्वीकारला महारेराचा पदभार

मनोज सौनिक यांनी स्वीकारला महारेराचा पदभार

मुंबई, दि. २० : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक यांनी महारेराचे अध्यक्ष म्हणून आज पदभार स्वीकारला. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज मंत्रालयात श्री. सौनिक यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, महारेराचे सदस्य महेश पाठक, माजी … Read more

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी राज्यात सहा लाखांहून अधिक अर्ज पात्र

‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी राज्यात सहा लाखांहून अधिक अर्ज पात्र

मुंबई, दि. १६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेकरिता राज्यात ६ लाख २५ हजार १३९ अर्ज पात्र झाले आहेत. राज्यात मुंबई विभागात ६३ हजार ९०, नाशिक विभागात १ लाख १२ … Read more

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेशासाठी सकारात्मक प्रयत्न

धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेशासाठी सकारात्मक प्रयत्न

मुंबई, दि. १५: धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल असे प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची … Read more

व्यवसाय उभारणीसाठी केंद्राच्या सहकारी संस्थांबाबतच्या नव्या कायद्याची माहिती घ्यावी – मंत्री दिलीप वळसे पाटील

व्यवसाय उभारणीसाठी केंद्राच्या सहकारी संस्थांबाबतच्या नव्या कायद्याची माहिती घ्यावी – मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे, दि. १५: विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी आता फक्त कर्ज घेऊन वाटप करणे आणि वसूल करणे एवढेच काम करणे अपेक्षित नसून आता केंद्र सरकारच्या सहकार विभागाने आणलेल्या नवीन कायद्यानुसार या संस्थांना १५१ प्रकारचे विविध व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. संस्थांच्या चेअरमन आणि सोसायट्यांनी या योजनांची माहिती घेऊन योजना राबवाव्यात, असे आवाहन सहकार मंत्री दिलीप वळसे … Read more

पुणे फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत

पुणे फेस्टिव्हलला पूर्वीप्रमाणे वैभवाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत

पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन पुणे, दि. 13 : सुमधूर सनईवादन, सेतू-कथ्थक व भरतनाट्यमचा मिलाफ असणाऱ्या नव्या स्वरूपातील नृत्याविष्कारातून गणेशवंदना, महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठांवर आधारित संबळवादन, गुजराती लोकनृत्य डांग, डाकला या गुजराती संगीतावर आधारित गरबा नृत्य, राष्ट्रीय एकात्मतेचा दर्शन घडविणारे ईशान्य भारतातील बांबू नृत्य, द ग्लोरी ऑफ सरहद, आंतरराष्ट्रीय सलोख्याचा संदेश देणारा ‘वसुधैव कुटुम्बकम्’ नृत्याविष्कार, महाराष्ट्राची परंपरा असणाऱ्या … Read more

‘नायब’ हस्तकला प्रदर्शनातून भारताच्या समृद्ध वारशाचे दर्शन

‘नायब’ हस्तकला प्रदर्शनातून भारताच्या समृद्ध वारशाचे दर्शन

हॉटेल ताज येथे प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबई, दि. १३ : ‘नायब’ या हस्तकला प्रदर्शनाचे फिकी फ्लोने केलेले उत्कृष्ट आयोजन, भारतातील हस्तकला आपल्या देशाच्या समृद्ध वैविध्यपूर्ण वारशाची प्रगल्भ पावती आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. हॉटेल ताज येथे फिकी फ्लो आणि हॉटेल ताज यांच्या समन्वयातून आयोजित नायब प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल श्री. राधाकृष्णन बोलत … Read more

सौर कृषिपंपातून शेतकऱ्यांना वीज विक्रीचे उत्पन्न मिळवून देणार

सौर कृषिपंपातून शेतकऱ्यांना वीज विक्रीचे उत्पन्न मिळवून देणार

लाभार्थी शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी महावितरणने तयार केलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन मुंबई, दि. १३: कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मुळे झाली आहे. आगामी काळात सौर कृषिपंपाच्या यंत्रणेतून निर्माण झालेली अतिरिक्त वीज विकून शेतकऱ्याला उत्पन्न मिळण्यासाठी योजना लागू करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री … Read more

डबेवाले आणि चर्मकार समाजाचे घरांचे स्वप्न होणार साकार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डबेवाले आणि चर्मकार समाजाचे घरांचे स्वप्न होणार साकार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती; १२ हजार घरांच्या निर्मितीसाठी सामंजस्य करार मुंबई, दि. १३:  मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजाबांधवांसाठी १२ हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी आज विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून डबेवाल्यांचे 60 वर्षांपासूनचे स्वप्न येत्या 3 वर्षांत साकार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

विधानसभा निवडणूक; मुंबईतील पूर्वतयारीचा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून आढावा

विधानसभा निवडणूक; मुंबईतील पूर्वतयारीचा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून आढावा

मुंबई, दि. १३ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारींचा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आज आढावा घेतला. तसेच निवडणुकीच्या कामकाजात कोणतीही कसूर राहू नये, यासाठी योग्य ती काळजी घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने, सहकार्याने कार्य करावे. कोणत्याही … Read more

उत्सव काळात भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे राज्यांना सतर्कतेचे आदेश

उत्सव काळात भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे राज्यांना सतर्कतेचे आदेश

नवी दिल्ली, १३: उत्सव काळादरम्यान मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची  वाढती मागणी लक्षात घेता, यात भेसळ होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असते. यामुळे ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेता, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा (FSSAI) ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना उत्पादन आणि विक्रीवर कठोर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या निर्देशानुसार, … Read more