धारावी पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन | Mahila Samupdeshan Kendra

धारावी पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन


मुंबई, दि. 21 : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी धारावी पोलीस ठाणे येथे महिला समुपदेशन केंद्र (Mahila Samupdeshan Kendra) सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र चालविण्यासाठी इच्छुक स्वयंसेवी संस्थांनी पुढील दहा दिवसांच्या आत अर्ज करण्याचे माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

अर्जदार संस्था ही नोंदणीकृत तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील (स्थानिक) महिला पदाधिकारी असलेली असायला हवी. संस्थेस किमान ३ वर्षांचा महिला समुपदेश क्षेत्रातील अनुभव आवश्यक जास्त अनुभव असल्यास प्राधान्य, समुपदेशनासाठी MSW उत्तीर्ण दोन समुपदेशक कर्मचारी यांची यादी व कागपत्रे जोडणे आवश्यक आहे. संस्थेची घटना व नियमावली आवश्यक ज्यामध्ये महिलांसाठी समुपदेशन केंद्र चालविणे हा उद्देश असावा. संस्थेचे मागील तीन महिन्यांचे महिनानिहाय बँक स्टेटमेंट जोडावे. अर्ज करताना संस्थेने कार्यरत पदाधिकारी यांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक यादी जोडावी.  संस्थेच्या कार्यकारी मंडळातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक नाहीत, तसेच कोणाही सदस्य शासकीय सेवेत नाहीत, याबाबतचे हमीपत्र जोडावे. संस्थेने सार्वजनिक संपत्तीचा अपहार केलेला नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडावे. संस्थेच्या पदाधिकारी (अध्यक्ष व सचिव) यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे स्वाक्षरीचे चारित्र्य प्रमाणपत्र जोडावे. तसेच ज्या स्वयंसेवी  संस्थांनी ( NGO ) समुपदेशन केंद्रासाठी यापूर्वी प्रस्ताव सादर केले होते, त्यांनीही पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई शहर, १९७ बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी मुंबई ४०००१८ येथे संपर्क साधावा.

Mahila Samupdeshan Kendra

 

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना | Gaushala Registration Process

Leave a Comment