LIC Scheme – या योजनेअंतर्गत २० रुपये बचतीवर मिळणार २ लाख ६५ हजार रुपये, जाणून घ्या

                      

adhar shila scheme

 

मुंबई | एलआयसीने (LIC) एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बचतीसाठी खास संधी आहे. यात तुम्हाला फक्त २० रुपयांची गुंतवणुक करायची आहे. याचा परतावा तुम्हाला २ लाख ६५ हजार रुपये मिळणार आहे.

आयुष्यभरात आपल्या इच्छा बाजूला ठेवत लोक बचत करतात. एक पै-पै पाठीमागे टाकत सर्वसामान्य लोकांना गुंतवणुकीचा प्रवास करावा लागतो आहे. गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित आणि हक्काचं ठिकाण म्हणजे एलआयसी असल्याचे आपन मानतो. एलआयसीच्या विविध योजना गुंतवणुकदारांसाठी उपलब्ध आहेत.

 ‘आधार शिला योजना’ असं एलआयसीच्या या योजनेचे नाव आहे. या योजनेत अनेक पर्याय आहेत. आता तुम्हाला फक्त दैनंदिन खर्चाचा विचार करुन दिवसाला २० रुपयांची गुंतवणुक करायची आहे. या बचतीवर तुम्ही लाखो रुपये वाचवू शकता. दिवसाला २० रुपये ही शुल्लक रक्कम बचतीसाठी  एकदम योग्य आहे.

जर तुम्ही ही योजना वयाच्या २५ व्या वर्षी सुरू केली. तर दिवसाला २० रुपये प्रमाणे एका महिन्याचे ६०० रुपये जमा होतील. दरमाह याच हिशोबाने गुंतवणूक झाल्यास तुम्ही ४५ वर्षाचे असाल तेव्हा तुम्हाला त्याचे २ लाख ६५ हजार रुपये मिळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत तुमच्या कुटुंबाला २ लाख रुपयांचे जोखीम मिळत आहे.

यामध्ये महिन्याच्या अनुषंगाने तुम्ही पैसे जमा करत असाल तर जीएसटीसह दरमाह ६२५ रुपये जमा करावे लागतील. याच प्रकारे तीन महिन्यांचे १८७४ रुपये तर सहा महिन्यांचे ३७०८ रुपये आणि एका वर्षाचे म्हटले तर ७३३९ रुपये जमा करावे लागतील.

तसेच या योजनेत दुर्दैवाने तुमच्यासोबत काही घडल्यास कुटुंबाला २ लाख रुपयांचे जोखीम संरक्षण मिळणार आहे. ४ लाखांचा अपघाती विमा यात उपलब्ध आहे. त्यामुळे गुंतवणुक करत बचतीचा तुमचा विचार असल्यास तुम्ही या योजनेत पैशाची बचत करत चांगला नफा मिळवू शकता.

LICs-Aadhaar-Shila

Leave a Comment