धार्मिक अल्पसंख्याक शाळांनी अनुदान योजनेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

धार्मिक अल्पसंख्याक शाळांनी अनुदान योजनेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 11 : मुंबई उपनगरातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येते. सन 2024-25 या वर्षासाठी अल्पसंख्याक बहुल शाळांनी 15 सप्टेंबर, 2024 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर  करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने केले … Read more

बीड जिल्हयाला बाल विवाह निर्मुलनासाठी स्कॉच चा पुरस्कार जाहीर

बीड जिल्हयाला बाल विवाह निर्मुलनासाठी स्कॉच चा पुरस्कार जाहीर

तत्कालीन  जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या कार्याचा गौरव        बीड, दि. 5 (जि. मा. का.) बीड जिल्हयाने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा चा  “स्कॉच 2024  राष्ट्रीय पुरस्कार”  बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना जाहीर झाला आहे. विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार संस्था प्रदान करीत असते.           त्या बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या … Read more

उद्योगांसाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी अमृत आणि आयजीटीआर यांच्यात सामंजस्य करार

उद्योगांसाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी अमृत आणि आयजीटीआर यांच्यात सामंजस्य करार

  प्रशिक्षणासाठी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई, दि.३ : उद्योगांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या इंडो जर्मन टूल रूम (आयजीटीआर)(छत्रपती संभाजीनगर) या लघु सूक्ष्म आणि मध्यम मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारत सरकारच्या प्रशिक्षण संस्थेशी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) पुणे या संस्थेने सामंजस्य करार केला आहे. यानुसार उद्योगांसाठीच्या तांत्रिक  प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना सहाय्य केले … Read more

पदवीप्रदान समारंभ : देशातील सर्व समुदायाच्या गरजा जाणून त्यांच्यासाठी सहाय्यकारी सॉफ्टवेअर, उत्पादने बनवावीत

पदवीप्रदान समारंभ : देशातील सर्व समुदायाच्या गरजा जाणून त्यांच्यासाठी सहाय्यकारी सॉफ्टवेअर, उत्पादने बनवावीत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न पुणे, दि. ३: देशातील विविध समुदाय, प्रदेशांची संस्कृती आणि त्यांच्या आजच्या गरजा समजून घेत देशातील प्रत्येकाच्या विशेषतः दुर्लक्षित घटकाच्या विकासाला सहाय्यकारी होऊ शकतील अशी सॉफ्टवेअर, आरोग्यसेवा उत्पादने आणि बाजारपेठीय धोरणे बनवावीत, असा संदेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना दिला. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ लवळे … Read more

विधी क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग सुदृढ न्यायव्यवस्थेचे द्योतक

विधी क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग सुदृढ न्यायव्यवस्थेचे द्योतक

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापिठात मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर दि.१ (जिमाका)- विधी व न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतोय ही सकारात्मक बाब असून भारतीय न्याय व्यवस्था अधिक सृदृढ आणि बळकट असल्याचे ते द्योतक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी आज येथे केले. येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापिठाच्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. … Read more

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ५० शिक्षकांचा विशेष योगदानाबद्दल ५ सप्टेंबर रोजी होणार गौरव

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ५० शिक्षकांचा विशेष योगदानाबद्दल ५ सप्टेंबर रोजी होणार गौरव

महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ नवी दिल्ली, दि. ३१ : शालेय, उच्च, आणि कौशल्य शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४’ साठी निवडलेल्या ५० शिक्षकांमध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद … Read more

ओबीसींच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

ओबीसींच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन चंद्रपूर, दि.१८ – आज ओबीसींसाठी वसतिगृह स्थापन होत आहेत. पण पूर्वी ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझी चर्चा झाली. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय असायला हवे, यावर शिक्कामोर्तब झाले. फाईल स्वाक्षरीसाठी माझ्याकडे आली तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता स्वाक्षरी केली. आणि ९ मार्च २०१७ ला महाराष्ट्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन … Read more

अन्य राज्यातून आयुर्वेद पदवीधारक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून संधी मिळणार

अन्य राज्यातून आयुर्वेद पदवीधारक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून संधी मिळणार

मुंबई, दि. ३ : बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन (बीएएमएस) पदवी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. अन्य राज्यातून आयुर्वेद पदवीधारक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम कोट्यातून संधी मिळणार आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता. आज वर्षा येथे महाराष्ट्र नवनिर्माण … Read more

राज्यातील बालगृहांच्या अडचणीसंदर्भात महिला व बालविकास मंत्री यांनी घेतला आढावा

राज्यातील बालगृहांच्या अडचणीसंदर्भात महिला व बालविकास मंत्री यांनी घेतला आढावा

मुंबई, दि.24 : राज्यातील स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालगृहांच्या अडचणीबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती  तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी सुरेखा ठाकरे, संस्थेचे प्रतिनिधी बाबूसिंग जाधव, कविता वाघ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालगृहांच्या प्रतिनिधींनी बालगृहांसंबंधी विविध समस्या मांडल्या. यामध्ये बालगृहातील कर्मचाऱ्यांना मानधन मंजूर करणे, बालगृहाच्या … Read more

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १९: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती’ योजनेकरिता २४ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन वैशाली मुडळे, जिल्हा व्यवस्थापक, मुंबई शहर-उपनगर यांनी केले आहे. मुंबई शहर,उपनगर जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थ्यांनी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व  … Read more