कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना 50 हजार रुपये | ऑनलाईन अर्ज सुरू होणार – Corona Victims

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना 50 हजार रुपये | ऑनलाईन अर्ज सुरू होणार – Corona Victims
AVvXsEg2yQyjYSZvVPefZ1eXRJSIqw0k9Pp4ojLd6inRTZ G WjGCdhX4cjkZQ2rkqH99rtIsEgHKpH358ktkj8WtyVR2k1TRExbjS6Jn4dwJc4xrD0W4IO lPgAXyeD24UhgDrxIl LJ3cVa 7JLIrIbg7jizAUU5SaQ bMIZMbND0VTdfzoBMHr9yDurGTGw=w400 h225

 

50 Thousand aid to the Families of Corona Victims: कोरोनामुळे मृत्यू झाल्येल्या व्यक्तिच्या कुटुंबाला 50,000 रुपयांची भरपाई मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या योजनेला सर्वोच्च न्यायालयाने

मंजुरी दिली आहे. यासह सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारांना कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये देण्याच्या केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आणि मदत निधीसाठी अर्ज केल्याच्या 30 दिवसांच्या आत रक्कम देण्याचे निर्देश दिले आहेत.

कोरोनामुळे बळी गेलेल्या लोकांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येणार आहे पण हे पैसे कुणाला मिळणार आहे आणि त्यासाठी काय काय करावे लागणार याबद्दलल अनेकाना माहीत नाही. तर यामुळे या लेखामध्ये जाणून घेऊया. या संदर्भात सरकारने काही नियम ठरवले आहेत. (50 thousand aid to the families of Corona victims, the Central Government)

प्रेस नोट

मा.सर्वोच्च न्यायालयाचे दिनांक ३० जून २०२१ रोजीच्या आदेशानुसार व त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कोविड-१९ या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रु.५०,०००/- एवढे सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केलेले आहे.

त्यानुसार, मा.प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांचे पत्र दिनांक १२ ऑक्टोंबर २०२१ अन्वये निर्देशित केले नुसार रु.५०,०००/- एवढे सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

नक्की कोणाला मिळेल योजनेचा लाभ?

  1. याचा लाभ सरसकट सर्वांना होईल, असे नाही कारण कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दाखला किवा त्याचा संदर्भ मृत्यू प्रमाणपत्रावर असणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने काही दिवसांपूर्वीच नियमावली काढली आहे.

  2. चाचणीद्वारे कोरोना झाल्याचे निष्पन झाल्यानंतर मृत्यू झाल्यास ही मदत मिळेल.

  3. टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्यानंतर उपचार सुरू असताना त्यांचा घरी किंवा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला, अशा लोकांनाच ही मदत मिळणार आहे.

  4. मृत्यू प्रमाणपत्रावर किंवा मृत्यू का झाला याचे कारण डॉक्टरांनी दिलेल्या सर्टिफिकेटवर कोरोनामुळे मृत्यू झालेले नमूद असावे, त्यानंतरच ही मदत मिळू शकणार आहे.

नोट: टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अपघात, विष पिऊन आत्महत्या किया इतर कोणत्याही प्रकारे मृत्यू झाल्यास तो मृत्यू कोरोनामुळे गृहीत धरला जाणार नाही. त्यामुळे अशांना ५० हजाराची मदत मिळू शकणार नाही.

कोणाच्या खात्यात मिळेल रक्कम?

ही मदत कोरोनाबळी गेलेल्या लोकांच्या कुठल्याही जवळच्या नातेवाईकाला मिळेल. त्यासाठी कोरोना बळी गेलेल्याचे आधार कार्ड आणि नातेवाईकाचे आधार कार्ड द्यावे लागणार.

किती दिवसांत मिळेल मदत?

केंद्राने सुप्रीम कोर्टात दिलेल्या माहितीनुसार, ५०,०००/-

रुपयांची ही मदत अर्ज केल्यानंतर ३० दिवसांच्या आत

देण्यात येणार आहे.

कशी असेल प्रोसेस…?

मदतीची रक्कम मिळविण्यासाठी मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी छापील अर्ज किंवा हॉस्पिटलच्या प्रमाणपत्रासह जिल्हा आपत्ती निवारण निधी अधिकारी किंवा त्यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल.

कागदपत्रे व अर्ज कुठे करायचा?

अर्ज:

हा अर्ज जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापत कक्षाकडे मिळेल. अर्ज भरून द्यावा लागेल.

कागदपत्रे:

  • मृत्यूचा दाखला
  • मृत्यू झालेल्या व्यक्तीचे आधार कार्ड
  • ज्यांना मदत मिळणार आहे त्यांचे आधार कार्ड जोडावे लागेल.
  • काही इतर आवश्यक कागदपत्रेही द्यावे लागतील.

नोट: साधारपणे इत्यादी कागदपत्रे द्यावे लागतील.

(Corona Death Person Family Get 50 Thousand Rupees)

Read more

कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

  कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर   अधिकारी-कर्मचारी घरी जाऊन घेणार शासकीय योजनांचे अर्ज शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार  सर्व तालुक्यात तालुकास्तरीय समन्वय समित्या कायदेशीर, मालमत्तांमधील हक्क मिळवून देणार   मुंबई, दि. 28: कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या … Read more