लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाची मतदार नोंदणी आवश्यक

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाची मतदार नोंदणी आवश्यक

यवतमाळ, दि. २८ (जिमाका):  सर्वसामान्य नागरिकांच्या मतदानाने लोकप्रतिनिधी निवडून येत असतात. आपल्या लोकप्रतिनिधींसह जनकल्याणकारी सरकार निवडण्याचा अधिकार राज्यघटनेने सर्वसामान्य नागरिकांना  मतदानाच्या माध्यमातून दिला आहे. त्यामुळे देशाची समृद्ध लोकशाही अधिक मजबूत, बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंदवावे व मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केल. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात सर्वत्र मतदार … Read more

संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्र्यांचे अभिवादन

संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्र्यांचे अभिवादन

यवतमाळ, २८ (जिमाका) : भारतीय संविधान दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ शहरातील संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रास्ताविकेचे मुख्य वाचन इयत्ता चौथीमध्ये शिकणारी अनुजा आनंद देवतळे हिने केले. यावेळी पालकमंत्र्यांनी संविधान दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या … Read more

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत

नंदुरबार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ (जिमाका वृत्त) – नंदुरबार जिल्ह्यात २६, २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेतपिकांचे व मालमत्तेच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत. जिल्ह्यात २६ नोव्हेंबर व २७ नोव्हेंबर २०२३ रोजी अवकाळी पाऊस … Read more

अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना साद

अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांना साद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूल मंत्री, कृषी मंत्र्यांना पत्र चंद्रपूर, दि. 27 : चंद्रपूर जिल्ह्याला 27 नोव्हेंबर 2023 रोजी अवकाळी पावसाचा फटका बसला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासंदर्भात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आग्रह राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी … Read more

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट

पुणे, दि.२७: सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव व शिरुर तालुक्यात काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. महसूल यंत्रणेने नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी  माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोपान … Read more

वसतिगृहातील महिला व मुलींशी साधला संवाद; नागपूर जिल्ह्यातील वसतिगृहाची आदिती तटकरेंकडून पाहणी

वसतिगृहातील महिला व मुलींशी साधला संवाद; नागपूर जिल्ह्यातील वसतिगृहाची आदिती तटकरेंकडून पाहणी

नागपूर दि.27 : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिला व बाल विकास विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या वसतिगृहांना आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी भेट दिली. या ठिकाणी त्यांनी महिला व मुलींशी चर्चा करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज काटोल रोड व कामठी रोडवरील शासकीय मुलींचे बालगृह, सरस्वती … Read more

बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील

बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील

नागपूर दि. 27 : राज्य शासन महिला बचत गटाच्या बळकटीकरणासाठी व सक्षमीकरणासाठी कायम प्रयत्नरत आहे. बचत गटांच्या चळवळीतून महिला एकत्र आल्या व त्यांना प्रगतीचा मार्ग मिळाला असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज केले. दाभा येथील ‘ॲग्रो व्हिजन’ या कृषी प्रदर्शनात महिला बचत गटाच्या मेळाव्याला श्रीमती तटकरे मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. केंद्रिय … Read more

‘ॲग्रो व्हिजन’च्या माध्यमातून नवीन पद्धती व तंत्रज्ञान शेतकऱ्‍यांपर्यंत

‘ॲग्रो व्हिजन’च्या माध्यमातून नवीन पद्धती व तंत्रज्ञान शेतकऱ्‍यांपर्यंत

नागपूर, दि. २७ – दरवर्षी ‘ॲग्रो व्हिजन’ प्रदर्शन  शेतकऱ्यांसाठी एक नवी संकल्पना, एक नवी दृष्टी आणि एक नवा उत्साह घेऊन येणारा कार्यक्रम असतो. जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात व पद्धतीमध्ये होत असलेले बदल ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यश आल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असलेल्या ‘ॲग्रो व्हिजन’ चा आज … Read more

प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन कटिबध्द

प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी शासन कटिबध्द

ठाणे, दि.२७ (जिमाका) : स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते चांगल्या दर्जाचे असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते आज पूर्ण होत आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते 40 लाख गरिबांना घरे देणे, त्यातून एसआरए योजना सुरू झाली. याच माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीचे स्वत:चे घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हे शासन कटिबध्द आहे, असे … Read more

धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेबांच्या संस्कारानुसार जनतेचे भले करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार

धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेबांच्या संस्कारानुसार जनतेचे भले करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार

ठाणे दि.२७ (जिमाका) :- सर्वधर्मसमभाव हा भाव मनात ठेवून समाजातील प्रत्येक गरजूला न्याय मिळवून देणे, हीच धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेबांची कार्यपद्धती होती, त्यांचेच आम्हीही अनुकरण करीत आहोत. दिघे साहेबांनी दिलेल्या संस्कारानुसार आपल्या हातून जनतेचे भले होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. धर्मवीर-२ या चित्रपटाच्या मुहूर्त शुभारंभ प्रसंगी … Read more