२७ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेत डेटा संकलन, संरक्षण, एआय सारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर भर


मुंबई, दि. 4: 27 वी राष्ट्रीय ई- गव्हर्नन्स परिषद 3-4 सप्टेंबर, 2024 रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी देखील अनेक माहितीपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र आणि राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ या चर्चा सत्राला प्रवक्ते म्हणून उपस्थित होते.

परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात ‘डेटा गव्हर्नन्स: प्रायव्हसी अँड सिक्युरीटी इन डिजिटल एज’ या सत्रने झाली. युआयडीएआयचे अमित अगरवाल, परेश शाह, ऋषी अगरवाल, अच्युत घोष, अमित शुक्ला या चर्चा सत्रात सहभागी झाले होते. विविध देशातील डेटा प्रायव्हसी ॲक्ट यावर देखील या सत्रात चर्चा झाली.

दुसऱ्या सत्रात गव्हर्नन्स मधील कृत्रिम बद्धिमत्ता या विषयावर चर्चा झाली. ‘एआय इन गव्हर्नन्स’ याविषयी प्रवक्त्यांनी त्यांची मते मांडली. यावेळी आय एम एम इंदोरचे प्रशांत सलवान, डॉ. शैलेश कुमार, प्रसाद उन्नीकृष्णन, आयआयटी गुडगावच्या अंजली कौशिक सहभागी झाले होते.

परिषदेतील तिसरे सत्र ‘सस्टेनिब्लिटी विथ ई- गव्हर्नर’ या विषयवार आधारित होते. या सत्राचे अध्यक्षपद गव्हर्मेंट अफेअर्सचे प्रमुख लवलीश चानाना (चान्ना) यांचेकडे देण्यात आले होते. एनआयसी महाराष्ट्राच्या सपना कपूर, प्रिमास पार्टनर इंडियाचे सह संस्थापक देवरूप धर, ग्रँट थोरंटन भारतचे रामेंद्र वर्मा सहभागी झाले होते. जगभरातील इतर देशांपेक्षा भारताकडे शाश्वत डेटा आहे, अशी माहिती यावेळी प्रवक्त्यांनी दिली. हरित तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धमत्ता शाश्वत प्रशासनात वापर अशा महत्वपूर्ण विषयांवर यावेळी चर्चा झाली.

ब्रेक आऊट सेशनच्या पहिल्या सत्रात इ गव्हर्नन्समध्ये जिल्हास्तरावरील पुढाकारात लॅब मित्र, वोखा साथी, व्हॉट्सअँप चाटबॉट, पोलीस स्टेशन इन्व्हेंटरीच्या प्रॉपर्टी रजिस्टरच्या डिजिटायझेशनमध्ये बारकोडचा वापर, पीसीएमसी स्मार्ट सारथी या विषयावर माहिती देण्यात आली. यावेळी एस. एन. त्रिपाठी  यांनी अध्यक्षस्थान भूषवले. या सत्रात वाराणसी जिल्हा दंडाधिकारी राजलिंगम, वोखाचे उपायुक्त अजित कुमार रंजन, चंदननगरचे पोलीस आयुक्त अमित जवलगी, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त शेखर सिंह, राजकोटचे महापालिका आयुक्त देवांग देसाई यांनी सहभाग घेतला.

ब्रेकआऊट सेशनच्या दुसऱ्या सत्रात साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, नांदेडच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करांवल, सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता, केंद्र शासनाच्या कापूस महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अप्पासाहेब धुळज, दूरसंचार मंत्रालयाचे उप महासंचालक सुमनेश जोशी सहभागी झाले होते. या प्रवक्त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामाची माहिती दिली. त्यांनी केलेल्या उपाययोजना इतर राज्यांना उपयुक्त ठरतील, यासाठी या सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

ब्रेकआउट नंतरच्या तिसऱ्या सत्रात ‘सायबर सिक्युरिटी अँड इमर्जन्सी रेस्पोंस रेडीनस’ यावर चर्चा झाली. कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आयटीचे महासंचालक डॉ. संजय बहाल या सत्राचे अध्यक्ष होते. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे संयुक्त सचिव नरेंद्र नाथ गांगवरापू, गव्हर्नमेंट बिजनेस टीसीएसचे विपणन व संपर्क प्रमुख चंदन रैना, डीएससीआयचे सीईओ श्रीनिवास गोडसे यांनी या सत्रात मार्गदर्शन केले. ई-ऑफिस संरक्षित प्रणाली, डिजिटल ट्रस्ट इन टाइम्स ऑफ डीप फेक्स, कृत्रिम बुद्धीमत्ता युगात राष्ट्रीय सायबर सुरक्षा फ्रेमवर्क विकसित करणे, आरोग्य प्रशासनात कृत्रिम बुद्धीमत्तेचे भविष्य, आपत्ती काळी केले जाणारे डेटा विश्लेषण यावर या सत्रात चर्चा झाली.

०००



Source link

Leave a Comment