ही दीपावली शेतकरी-बळीराजाच्या आयुष्यात समृद्धीचा प्रकाश घेऊन येणारी ठरावी
परळी वैद्यनाथ (दि. 11) – उद्यापासून तेजोमय प्रकाश, आनंद व समृद्धीचे प्रतीक असलेल्या दीपावलीचे पर्व सुरू होत असून, यानिमित्ताने शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या आयुष्यात भरभराट व समृद्धीचा प्रकाश घरोघरी नांदावा, अशा शब्दात कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दीपावली निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
दिवाळीचे पर्व, अभ्यंग स्नान, दीपावली, लक्ष्मीपूजन, पाडवा अशा विविध सणांनीं संपन्न असते. सर्व कुटुंब एकत्रित येऊन दीपावलीच्या या पर्वाचा आनंद घेताना फराळ, फटाके याचा आनंद घेत उत्सव साजरा केला जातो.
दीपावलीच्या या पर्वाच्या शुभेच्छा देताना धनंजय मुंडे यांनी फटाके वाजवताना काळजी घ्यावी तसेच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
00000