स्वयंम योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन


मुंबई, दि.14 : आदिवासी विकास विभागांतर्गत पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांची वयोमर्यादा 28 वरुन 30 करण्यात आली आहे. ऑनलाईन प्रणालीतील संकेतस्थळावर योग्य तो बदल केला आहे. पूर्वी तांत्रिक अडचणीमुळे सन 2023-24 करिता अर्ज न करु शकलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी स्वयंम योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाने केले आहे.

आदिवासी विकास विभागाच्या 15 मे 2023 च्या शासन निर्णयान्वये पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्याकरिता वयोमर्यादा 28 वरुन 30 करण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाईन प्रणालीत आवश्यक ते बदल करुन सन 2022-23 करिता विद्यार्थ्यांना या योजनेकरिता लाभ घेता आला आहे. तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे सन 2023-24 करिता काही विद्यार्थ्यांना स्वयंम योजनेचा अर्ज भरता न आल्याने महाआयटी लि. मुंबई यांनी ऑनलाईन प्रणालीतील संकेतस्थळावर योग्य तो बदल केला आहे, असे अपर आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

शैलजा पाटील/विसंअSource link

Leave a Comment