विधानसभा कामकाज 


नागपूर, दि. 18: अमरावती येथे मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा सापडल्याप्रकरणी आणि जालना येथे घडलेल्या गोळीबार घटनेप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केले.

विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी अधिवेशनामध्ये उपस्थित केलेल्या मुद्दाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला. याप्रकरणी दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 75 हजार 500 रुपये किंमतीचा शस्त्र साठा जप्त केला आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीच्या घराच्या झडती दरम्यानही शस्त्र साठा सापडल्याने आर्म ॲक्टसह विविध गुन्हे संबंधितांवर दाखल करण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

जालन्यात गजानन तौर या व्यक्तीवर झालेल्या झालेला गोळीबार प्रकरणीही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निवेदन केले. याप्रकरणातील संबंधित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

00000



Source link

Leave a Comment