विकसित भारत संकल्प यात्रा संवाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित


नागपूर, दि. 9 : विकसित भारत संकल्प यात्रा उपक्रमात आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संवाद कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

नागपुरात महा रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या हजारोच्या संख्येतील तरुणाईने हा संवाद विद्यापीठाच्या परिसरातील भव्य व्यासपीठावर बघितला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दटके, प्रसाद लाड, अभिमन्यू पवार, विकास कुंभारे, आशिष जायस्वाल, मोहन मते, कृष्णा खोपडे, विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, टेक महिंद्रा कंपनीचे सीईओ निखील अलुरकर यावेळी उपस्थित होते.

‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना आणि उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे विविध राज्यांतील लाभार्थ्यांना संबोधित केले. योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी  चर्चा करून त्यांचा अनुभव जाणून घेतला.

000000

 



Source link

Leave a Comment