डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भव्य स्वागत
नागपूर दि. १: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवसांच्या नागपूर भेटीवर असून आज दुपारी १२.२० ला आगमन झाले. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. तर शनिवार २ डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षान्त समारंभात राष्ट्रपती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपतींचे एअर इंडियाच्या विमानाने आगमन झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअरमार्शल विवेक गर्क, ब्रिगेडिअर राहुल दत्त, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदींनी त्यांचे स्वागत केले.
राष्ट्रपतींचे राजभवन येथे स्वागत
दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज राजभवन येथे आगमन झाले, त्याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, उपजिल्हाधिकारी पूजा पाटील उपस्थित होते.
०००