राज्यपाल रमेश बैस यांचे तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आगमन


नागपूर, दि. 7 : राज्यपाल रमेश बैस यांचे गुरुवारी रात्री साडेआठ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर आगमन झाले. १० डिसेंबरपर्यंत ते विदर्भ दौऱ्यावर आहेत.

आज विमानतळावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदी उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन 3 scaled

राज्यपाल रमेश बैस यांचा गुरुवारी रात्री राजभवन येथे मुक्काम असून उद्या सकाळी 9.40 वाजता राजभवन येथून भंडाराकडे प्रयाण करतील. त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील संरक्षण सेवा अकादमी, शहापूर येथे होणाऱ्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमास उपस्थित राहतील. उद्या भंडारा जिल्हयात त्यांचे विविध कार्यक्रम आहेत.

शनिवारी त्यांचा अमरावती व वर्धा दौरा आहे.  तर रविवारी ते गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रविवारी रात्री ते मुंबईकडे प्रयाण करतील.Source link

Leave a Comment