मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन


मुंबई, दि. २३ :- महान स्वातंत्र्यसेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

849adc8c 3b41 4e32 8bc9 d976c2cc8a32

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नेताजी बोस तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, खासदार प्रतापराव जाधव, आमदार महेश शिंदे, आमदार संजय रायमुलकर आदी मान्यवरांनीही नेताजी बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.

000Source link

Leave a Comment