मुंबई शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च हिशोब तपासणीसाठी वेळापत्रक जाहीर


election7 1

मुंबई, दि. ०२ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवार, प्रतिनिधींनी वेळापत्रकानुसार विहित दिवशी व वेळेला उपस्थित राहण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी या पाच विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता तर शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या पाच विधानसभा मतदारसंघासाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून अमन प्रित काम पाहत आहेत.

विधानसभा मतदारसंघाच्या खर्च निरीक्षकांनी उमेदवारांचा खर्च तपासणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. 

खर्च तपासणीसाठी तारीख :- 

१) गुरुवार दि. ७ नोव्हेंबर २०२४

२) बुधवार दि. १३ नोव्हेंबर २०२४

३) सोमवार दि.१८ नोव्हेंबर २०२४

तपासणीचे ठिकाण :- सह्याद्री अतिथीगृह तळमजला बैठक कक्ष  मलबार हिल, मुंबई.

तपासणीची वेळ :- सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होईल.

उमेदवार, प्रतिनिधींनी सर्व प्रकारच्या नोंदवह्या जसे की, दैनंदिन खर्च नोंदवही, रोख नोंदवही, बँक नोंदवही, संबंधित प्रमाणके, देयके (खर्चाच्या पावत्या), बँक पासबुक व इतर सर्व मूळ कागदपत्रांसह वरील नमूद ठिकाणी व दिनांकास विहीत वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन श्री. यादव यांनी केले आहे.

0000



Source link

Leave a Comment