‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ मध्ये २४ जानेवारी रोजी ‘पर्यटन परिषद’


मुंबई,दि.23 : राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत 20 ते 28 जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये बुधवार, 24 जानेवारी रोजी कलिना येथील हॉटेल ग्रॅण्ड हयात येथे पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन, अभिनेत्री दिया मिर्झा, पर्यटन सचिव जयश्री भोज या परिषदेला उपस्थित राहतील.

‘शाश्वत पर्यटनात मुंबई आघाडीवर कसे राहील, महाराष्ट्राचे ‘ग्रामीण पर्यटन विकास’ या विषयावर चर्चासत्र होईल. यामध्ये, ईझी माय ट्रीपचे सहसंस्थापक प्रशांत पाटील, भारत आणि दक्षिण-पश्चिम आशियाचे हयात हॉटेल्स कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुजय शर्मा सहभागी होतील.

सकाळी ११.२० ते दुपारी १२ या वेळेत या वेळेत ‘महाराष्ट्राची शाश्वत इकोसिस्टिम तयार करणे’ याविषयी पॅनेल चर्चासत्रामध्ये पर्यटन मंत्रालयाच्या ट्रॅव्हल फॉर लाइफच्या नोडल ऑफिसर डॉ.मोनिका प्रकाश, भारत टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक एम.आर.सिनरम, वीणा वर्ल्डचे संस्थापक सल्लागार सुधीर पाटील, मॅरियटचे सीईओ रंजू ॲलेक्स,हॉटेल्स महिंद्रा हॉलिडेज ॲण्ड रिसॉर्टस इंडियाचे सीईओ संतोष कुट्टी, आयटीसी हॉटेल्स वेस्ट आणि नॉर्थचे अतुल भल्ला, आर्थिक विकास सल्लागार सहभागीदार सुची त्रिवेदी यांचा सहभाग असेल. दुपारी १ वाजता अभिनेत्री दिया मिर्झा यांचा संदेश दाखविण्यात येईल.

दुपारी १२ ते १२.४५ या वेळेत ‘मुंबईच्या शाश्वत विकासासाठी पर्यटन कौशल्य विकसित करणे’ या विषयावरील चर्चासत्रामध्ये वित्त व नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग टेक्नॉलॉजीचे सीईओ ग्यान भूषण, हॉटेल ॲण्ड मॅनेजमेंटचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी,इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचे मोहम्मद अख्तर, ईटीचे आशुतोष सिन्हा यांचा सहभाग असेल.

दुपारी २ .३० ते ३.१० पर्यंत ‘महाराष्ट्राचे ग्रामीण पर्यटनाचे व्हिजन’ या विषयावर ब्लू स्टार हवाई प्रवास सेवाचे माधव ओझा, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या ऑफिसर कामाक्षी माहेश्वरी, ईटीचे माधव सिन्हा यांचा सहभाग असेल.

दुपारी ३.१० ते ४ या वेळेत  ‘पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देणे’ या विषयावरील चर्चा सत्रामध्ये  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, शाश्वत क्लांयट सॉल्यूशेनचे उमित भाटिया, सर्व्हिस क्वालिटीचे अध्यक्ष अब्राहम अलपट्टा यांचा सहभाग असेल.

दुपारी ४ ते ४.४५ या वेळेत ‘जागतिक पर्यटनातून महाराष्ट्र काय शिकेल’ या विषयावरील चर्चा सत्रामध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, पर्यटन सचिव जयश्री भोज, लेझर ट्रॅव्हल्सचे प्रादेशिक प्रमुख हिमांशु संपत, एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, स्टर्लिंग हॉलिडेजचे अधिकारी अनुपमा दत्ता, प्लॅटिनम मॉडिरेटचे  व्यवस्थापकीय संचालक बिरजू गरीबा यांचा सहभाग असणार आहे.

तत्पूर्वी जुहू बीच येथे सकाळी ६ ते ८ वाजता योगा, फुटबॉल ,व्हॉलिबॉल सकाळी ७ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत,सिनेमा फेस्ट १५ पीव्हीआर सिनेमा गृहात विविध ठिकाणी, कार्डिनल ग्रेसीएस म्युनिसिपल प्ले ग्राऊंड येथे  सांयकाळी ७ वाजता म्युझिक फेस्टचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

००००  

संध्या गरवारे/विसंअ



Source link

Leave a Comment