माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन


मुंबई, दि. 24 :- “देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी हे लोकमान्य, लोकप्रिय नेते होते. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाला विकासाच्या वाटेवर पुढे नेण्याचं काम त्यांनी यशस्वीपणे केलं. लोकशाहीत सर्वपक्षीय, सर्वधर्मीयांचा सहभाग महत्वाचा मानणारं, निर्णयप्रक्रियेत सर्वांना सामावून घेणारं त्यांचं नेतृत्वं होतं.

देशाच्या राजकारणाला त्यांनी उदारमतवादी, सुसंस्कृत चेहरा दिला. समाजातील सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांतांच्या नागरिकांना आपलेसे वाटणारे अटलबिहारी वाजपेयी हे आदर्श राजकारणी होते. कवीमनाचे, संवेदनशील व्यक्तिमत्वाचे आदरणीय अटलबिहारी वाजपेयी साहेब देशवासियांच्या कायम स्मरणात राहतील. त्यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या विचारांना, कार्याला, स्मृतींना विनम्र अभिवादन…,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यानी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन अभिवादन केले आहे.Source link

Leave a Comment