भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर


मुंबई दि. 19 : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2023-24 मध्ये राबविण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 40 लाख रुपये निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाकडून निर्गमित करण्यात आला आहे.

महात्मा गांधी  राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरीता पात्र ठरु शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केली आहे.

सन 2023-24 या आर्थिक वर्षात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या अंमलबजावणीकरिता अनुसूचित जाती प्रवगासाठी रु.40.00 लाख (रुपये चाळीस लाख फक्त) निधी आयुक्त (कृषी), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध  करून देण्यात आला आहे .

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/



Source link

Leave a Comment