बांधकाम कामगार पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्या उद्घाटन


मुंबई, दि. 29 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेच्या माध्यमातून भारतीय मजदूर संघ आणि कन्स्ट्रक्शन स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांसाठी पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम, श्रमिकांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे गुरुवार ३० नोव्हेंबर २०२३ रोजी  शारदा मं‍दिर महाविद्यालय एच.जी.रोड जे. के. टॉवरजवळ ग्रामदेवी मुंबई येथे सायंकाळी ५ वाजता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.                                                       

000

संध्या गरवारे/विसंअ/



Source link

Leave a Comment