पोलिसांनी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक जबाबदारी म्हणून समाजसेवा सुरु ठेवावी


यवतमाळ, दि.23 : पोलिसांनी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक जबाबदारी म्हणून समाजसेवा अविरत सुरु ठेवावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन यवतमाळद्वारा आयोजित सेवानिवृत्त पोलीस स्नेहमिलन सोहळा येथील सेलिब्रेशन हॉल येथे उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यास आमदार मदन येरावार, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक चंदनसिंग बयास, तारीक लोखंडवाला यांच्यासह सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्याचे कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.

या सोहळ्यात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.Source link

Leave a Comment