पीकस्पर्धेतील विजेत्यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार


यवतमाळ, दि.28 (जिमाका) : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला या कृषी विद्यापीठाच्या, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, महोसव-२०२३ च्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते ‘पिक स्पर्धेत विजयी झालेल्या शेतकऱ्यांचे सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

सन्मानीय डॉ. शरद गडाख, कुलगुरु, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांचे संकल्पनेतून तर डॉ. डी. बी. उंदिरवाडे, संचालक यांच्या मार्गदर्शनातून आदर्शगाव संकल्पना राबविण्यात येत आहे.वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ सुरेश नेमाडे , यांच्या नेतृत्वातून कृषि विज्ञान केंद्राकडून आदर्शगाव म्हणून बाभूळगाव तालुक्यातील महमदपूर या गावाची निवड करण्यात आली.

 सदरच्या दत्तक गावामध्ये खरीप हंगामामध्ये कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ अंतर्गत सोयाबीन पिकाकरीता ‘पिक स्पर्धेचे’ आयोजन करयात आले होते. सदरची ‘पिक स्पर्धा’ एकुण २५ एकरावर वर राबिवण्यात आली होती. यामध्ये एकुण २५ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

 या ‘पिक स्पर्धेच्या’ माध्यमातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे शिफारसीत तंत्रज्ञानाची माहिती देवून, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषी विज्ञान केंद्राने वेळोवेळी मार्गदर्शन केले. या पिक स्पर्धेच्या माध्यमातून महमदपूर गावामधून श्री. विठ्ठल जगन्नाथ मुंडले यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर मंगेश पुरुषोत्तम देवतळे यांनी व्दितीय क्रमांक पटकावला.

यासंगी सन्मानीय कुलगुरु डॉ. शरद गडाख, संचालक डॉ. डी. बी. उंदरवाडे, कुलसिचव सुधीर राठोड,  आदी मान्यव उपिथत होते.

उपरोक्त राबिवण्यात आलेया ‘पिक स्पर्धा’ या उपक्रमाचा आदर्श घेवून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी विद्यापीठाच्या शिफारशीत तंत्रज्ञानाचा उपादन वाढीसाठी सला यावा. अशी िवनंती कृषी िवान काचे मुख मा. डॉ सुरेश नेमाडे , वर शा तथा मुख, कृिवके, यवतमाळ यांनी केली आहे.

000Source link

Leave a Comment