उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत पशुधनाच्या नुकसान भरपाईचे धनादेश वितरित
बारामती, दि.२४- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तालुक्यातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पाळीव पशुधन नुकसान भरपाईचे धनादेश वाटप करण्यात आले.
वनविभागाच्यावतीने विद्या प्रतिष्ठान येथे आयोजित धनादेश वितरण कार्यक्रमात पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर पोलीस पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव आदी उपस्थित होते.
सन २०२३ मध्ये बिबट, लांडगा या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात १० पशुधन मालकांच्या २५ पाळीव प्राण्यांचा मृत्यू झालेला असून एकूण ३ लाख ६४ हजार रुपयांचे धनादेश वितरण करण्यात आले.
000