नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करावी


मुंबई, दि. 11 : राज्यातील नवीन मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवून महाविद्यालय सुरू करण्याच्यादृष्टीने सर्व तयारी तातडीने करण्यात यावी. शासनस्तरावरील प्रस्ताव असतील तर ते तत्काळ सादर करण्यात यावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधितांना दिल्या.

आज मंत्रालयात राज्यातील नवीन मंजूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, रुग्णालयांच्या विविध समस्याबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.

xHasan mushrif 1

यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. रामन घुंगराळेकर, तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, अधिष्ठाता उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ यांनी अंबरनाथ, भंडारा, गडचिरोली, बुलढाणा, वर्धा- हिंगणघाट, अमरावती, हिंगोली, जालना, नाशिक, वाशिम, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी जागांची उपलब्धता, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम प्रगती, शासकीय जमिनींचे हस्तांतरण, निधी वितरण विषयी आढावा घेऊन संबंधितांना निर्देश दिले.

रा. आ. पोदार वैद्यकीय महाविद्यालयाचा श्रेणीवर्धन व बळकटीकरणासाठी प्रस्ताव सादर करावे

वरळी येथील रा.आ.पोदार वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्नित म.आ.पोदार रुग्णालय याठिकाणी विद्यार्थी प्रवेश क्षमता 60 असताना पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या वर्ग आणि परीक्षेसाठी पाच अध्ययन खोल्या बांधल्या होत्या. सध्या विद्यार्थ्यांची वाढलेली क्षमता विचारात घेता विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी तसेच परीक्षेसाठी बसण्याची व्यवस्था अपूर्ण पडत आहे. महाविद्यालयाच्या श्रेणीवर्धन व बळकटीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशाही सूचना मंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिल्या.

0000

राजू धोत्रे/विसंअ/Source link

Leave a Comment