दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली


नागपूर, दि. 7 :  विधानसभेत दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील शोकप्रस्ताव मांडला.

विधानसभेचे विद्यमान सदस्य गोवर्धन मांगीलालजी शर्मा, माजी मंत्री बबनराव ढाकणे तसेच विधानसभेचे  माजी सदस्य गुलाबराव वामनराव पाटील, श्रीपतराव दिनकरराव शिंदे, शेख रशीद शेख शफी, राजाराम नथू ओझरे, वसंतराव जनार्दन कार्लेकर, गोविंद रामजी शेंडे, दिगंबर नारायण विशे यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोक प्रस्ताव मंजूर केला. दिवंगत सदस्यांच्या विधानसभेतील कामकाजास अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी यावेळी उजाळा दिला. यावेळी सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.Source link

Leave a Comment