‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत


मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘शाश्वत पर्यावरण विकास परिषद’ या विषयावर कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

पर्यावरण संरक्षणासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन आणि लातूर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने मुंबईत 9 जानेवारी 2024 रोजी “शाश्वत पर्यावरण विकास” परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या  परिषदेच्या माध्यमातून खासगी क्षेत्रातील अग्रणी उद्योग, खासगी व सरकारी संस्था, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था आणि नागरिकांमध्ये जनजागृती आणि मार्गदर्शन याबाबतची माहिती ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष श्री. पटेल यांनी दिली आहे.

xJay Maharashtra prog 1 3

‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. पटेल यांची मुलाखत गुरुवार दि. 4, शुक्रवार दि. 5 आणि शनिवार दि. 6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शनिवार, दि. 6 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक श्रीकांत कुळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

 



Source link

Leave a Comment