‘दिलखुलास’मध्ये खादी ग्रामोद्योग मंडळाचे बिपिन जगताप यांची १८ व १९ जानेवारीला मुलाखत


 मुंबईदि. 18 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मध महोत्सव 2024’ या विषयावर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत 18 व 19 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरसभागृह येथे देशातील पहिला मध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या मध महोत्सवाचा मुख्य उद्देशत्याचे नियोजन व अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे याविषयीची माहिती मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगताप यांनी दिलखुलास‘ कार्यक्रमातून दिली आहे.

दिलखुलास‘ कार्यक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जगताप यांची मुलाखत शुक्रवार दि. 19 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००



Source link

Leave a Comment