डॉ. प्रभा अत्रे यांचे जीवन संगीताची अखंड तपस्या  – राज्यपाल रमेश बैस


मुंबई, दि. १३ : विख्यात शास्त्रीय संगीत गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केले आहे.

डॉ. प्रभा अत्रे या संशोधक वृत्तीच्या प्रयोगशील गायिका व संगीत रचनाकार होत्या. आपल्या प्रदीर्घ  सांगीतिक कारकीर्दीत त्यांनी नवतेचा अंगीकार केला व भारतीय शास्त्रीय संगीत एका मोठ्या उंचीवर नेले. आपला सांगीतिक वारसा पुढे नेताना त्यांनी शिष्यांना मुक्तहस्ते विद्यादान केले. डॉ. अत्रे यांच्या रचना अजरामर आहेत. त्यांचे जीवन ही अखंड तपस्या होती. त्यांच्या महान कार्याला वंदन करतो व त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.Source link

Leave a Comment