‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची उद्या मुलाखत 


मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘डीप क्लीनिंग ड्राइव्ह’ मोहिमेची अंमलबजावणी’ या विषयावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी महानगरपालिकेने सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई महानगरपालिकेने ‘डीप क्लिनिंग ड्राइव्ह’ मोहीम सुरु केली आहे. या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून मुंबईमधील विविध भागांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने स्वच्छता करण्यात येत आहे. या मोहिमेचे नियोजन, अंमलबजावणी व नागरिकांचा सहभाग याबाबत अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत उद्या गुरुवार, दि. 28 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

००००Source link

Leave a Comment