गवसे, दर्डेवाडी गावे इको सेन्सिटिव झोनमधून वगळण्याबाबत केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा करणार


मुंबईदि. १८ : कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे गवसे आणि दर्डेवाडी (ता. आजरा) ही गावे इको सेन्सिटीव झोन मधून वगळण्याबाबत केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी चर्चा केली जाईल. या गावातील परिस्थिती अभ्यासून त्याप्रमाणे निश्चितपणे सकारात्मक कार्यवाही केली जाईलअशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

मंत्रालयातील परिषद सभागृहात यासंदर्भातील बैठक झाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफवन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि संबंधित गावांतील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीआजरा तालुक्यातील या दोन गावांप्रमाणेच इतर काही गावांतही इको सेन्सिटिव झोनच्या अनुषंगाने प्रश्न आहेत. त्याबाबतही त्रिसदस्यीय समिती नेमून गावे वगळण्याबाबत निर्णय घेण्याची कार्यवाही केली जाईल.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले कीया गावांचा परिसर हा अनेक वर्षापासून औद्योगिकदृष्ट्या वाढला आहे. इको सेन्सिटिव झोनमुळे स्थानिक विकासाला खीळ बसणार असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. वस्तुस्थिती तपासून यामध्ये निर्णय घेतला जावाअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.      

000

दीपक चव्हाण/विसंअ/



Source link

Leave a Comment