ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन


पुणे, दि.१:  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले.

WhatsApp Image 2024 01 01 at 8.33.19 AM 2.jpeg.pagespeed.ce.QOjgyv9ESB

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  पेरणेफाटा येथील विजयस्तंभास अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने उत्तम व्यवस्था केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

WhatsApp Image 2024 01 01 at 8.33.19 AM.jpeg.pagespeed.ce.J07Y6imeTK

क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टीमार्फत आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते  करण्यात आले.

WhatsApp Image 2024 01 01 at 8.33.18 AM.jpeg.pagespeed.ce.2PLf5kShX1

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, अतिरिक्त आयुक्त दिनेश ढोके, समाज कल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, उपायुक्त वृषाली शिंदे आदी उपस्थित होते.

०००



Source link

Leave a Comment