उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दवाखाना आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ


नागपूर, दि. 9 : जिल्हा खनिज प्रतिष्टान निधीतून ‘दवाखाना आपल्या दारी’ या उक्रमाचा शुभारंभ आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसरात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. ग्रामीण भागातील जनतेपर्यंत आरोग्य वाहिनी व फिरत्या वैद्यकीय चमुच्या सहाय्याने सर्वसमावेशक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

उद्गाटनप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशीष जायस्वाल, सुभाष देशमुख, प्रवीण दटके, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, महानगरपालिका आयुक्त डॅा. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॅा.विपीन इटनकर, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले यांच्यासह जिल्हा आरोग्य यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दवाखाना आपल्या दारी 1

आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांची एकत्रितपणे अंमलबजावणी एका छताखाली या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. आवश्यक औषधी व साधनसामुग्री तसेच आरोग्य चमूसह ‘आरोग्यवाहिनी’ सुसज्ज असणार आहे. एएनएम, डाटा एन्ट्री ऑपरेटर, आरोग्य सहाय्यक यासह डॉक्टरांची चमू आरोग्यवाहिनी उपस्थित  असणार आहेत.

आरोग्य चमूचा दैनंदिन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. प्रत्येक गावात शिबिराच्या एक दिवस आधी विविध माध्यमांसह दवंडी देऊन जनतेला माहिती देण्यात येणार आहे. या पथकामार्फत आऱोग्य सेवांसोबतच आयुष्मान भारत कार्ड, आभा कार्ड, प्रधानमंत्री मातृत्व अनुदान योजनेची नोंदणी करण्यात येईल. आवश्यक रक्त चाचण्या तसेच रुग्णांना पुढील सेवेसाठी संदर्भित करण्यात येणार आहे.

00000



Source link

Leave a Comment